5.7 C
New York
Sunday, April 26, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️वाल्मिकचा ३००० कि.मी. चा प्रवास, २२ दिवस कुठं कुठं लपला?

♦️वाल्मिकचा ३००० कि.मी. चा प्रवास, २२ दिवस कुठं कुठं लपला?

शिवगर्जना न्यूज, 

बिड

बिड: मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये मागील सूत्रधार असा ठपका असलेल्या वाल्मिक कराड याने मंगळवारी पुण्यातील सी.आय.डी. कार्यालयात शरण आला. शरणागती पत्करण्या पूर्वी वाल्मिकीने एक व्हिडिओ शेअर करून मोठा दावा केला आहे. 

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास २२ ते २३ दिवस उलटले आहेत. वाल्मिक कराडचं नाव या प्रकरणात आल्यानंतर त्याचा तपास बीड पोलिस घेत होते. मात्र आजच वाल्मिक कराड पोलिसांकडे न जाता पुण्यात सीआयडी समोर शरण आला. पोलिसांच्या हाती लोकेशन लागू नये यासाठी वाल्मिक हा एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी फिरत होता.

वाल्मिक कराड जवळपास २२ दिवसात २५००- ३००० किमी प्रवास केला आहे. वाल्मिक कराड याला ताब्यात घेण्यासाठी CID आणि SIT देशभर जंग जंग पछाडत होते. ११ डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल होता. त्यानंतरही वाल्मिक कराड हा सोशल मीडियावर चांगलाच ॲक्टिव्ह होता. त्याचे लोकेशन माहित असताना त्याला ताब्यात का घेण्यात आले नव्हते. नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूरला ही वाल्मिक कराडने काही जणांना भेटी गाठी घेतल्या होत्या. तरी देखील कराड कडे कोणाचेही लक्ष गेले नाही.

◼️वाल्मिक कराडने केव्हा, कुठे, कसा केला प्रवास?

▪️वाल्मिक कराड हा ९ डिसेंबर रोजी परळी मधून बाहेर पडला.

▪️१० आणि ११ डिसेंबर रोजी तो उज्जैनमध्ये दर्शनासाठी मंदिर परिसरात होता. ११ तारखेला त्याने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

▪️१२ डिसेंबर रोजी वाल्मिक कराडने भाजप नेते गोपीनाथ मुंढे यांच्या जयंती निमित्त सोशल मीडियावर पोस्ट केली. त्याचे लोकेशन परळी दाखवण्यात आले.

▪️१३ डिसेंबर रोजी त्याचे लोकेशन समजून आले नाही.

▪️१४ डिसेंबरला वाल्मिक कराडने दत्त जयंती निमित्त पोस्ट टाकली. 

▪️१५ डिसेंबर रोजी त्याने धनंजय मुंढे आणि पंकजा मुंढे यांना मंत्री पदा बद्दल शुभेच्छा देणारी सोशल मीडियावर पोस्ट केली.

▪️१६ तारखेला वाल्मिक कराड मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्य होता त्यानंतर तो गायब झाला.

त्यानंतर वाल्मिकच्या कार्यकर्त्यांच्या माहिती नुसार तो अक्कलकोट नंतर वाल्मिक पुण्यात आला दोन दिवस रुग्णालयात होता.

विशेष म्हणजे गेली २२ दिवस वाल्मिक कराड हा एवढा फिरत होता. त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांना कोणत्याही टोल नाक्यावर किंवा कोणत्याही सी.सी.टीव्ही. कॅमेऱ्यात कैद झाला नाही, याचे कुतूहल वाटते. 

शिवगर्जना न्यूज संपादक :

श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या