
🔴 वाल्मिक कराड अटकेत.
◼️ सुदर्शन घुलेनं देश सोडला? नेपाळ ‘कनेक्शन’ आलं समोर.
शिवगर्जना न्यूज,
बिड
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निषेध मोर्चे काढले जात आहे.
संतोष देशमुख प्रकरणी मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडने सी.आय.डी. समोर सरेंडर केलं आहे. यामुळे पोलीस तपासाला वेग आल्याचं बोललं गेलं. पण अजूनही तीन आरोपी फरारी आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी सीआयडीची ७ पथके देशभर रवाना झाली आहेत. तरीही मुख्य आरोपी सुदर्शन घुले चा अद्याप थांगपत्ता लागतच नाही.
सुदर्शन घुलेनं देश सोडला का? असा संशय व्यक्त केला जात आहे. सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी तो नेपाळला गेल्याचा इतिहास आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपीनं पोलिसांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी नेपाळला पलायन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
◼️सुदर्शन घुलेचं नेपाळ कनेक्शन काय?
सी.आय.डी. तील सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी सी.आय.डी. ने ७ पथके विविध राज्यासह देशभर रवाना केली आहेत. या अगोदर सुदर्शन घुले हा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याने सराईत गुन्हेगार आहे. तसेच यापूर्वी एका गुन्हात फरार असताना तो नेपाळला गेल्याची देखील माहिती समोर आहे. त्यामुळे पुन्हा तो नेपाळला जाऊ शकतो का? किंवा नेपाळला गेला का? या संदर्भात सी.आय.डी. ला संशय आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील सी.आय.डी. तपास करत आहे. फरार असलेले तीन आरोपी यांना अटक करण्याच्या दृष्टिकोनातून सी.आय.डी. ने आता तपासाचा फास आवळला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला २३ दिवस झाले आहेत. परंतु अद्याप ही तीन आरोपी फरार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान एस.आय.टी. ची घोषणा केली होती. बुधवारी, एस.आय.टी. स्थापनेची गृह विभागाकडून अधिकृत आदेश काढण्यात आले.
◼️ एस.आय.टी. मध्ये कोणाचा समावेश?
▪️आय.पी.एस.अधिकारी डॉ. बसवराज तेली – पोलीस उपमहानिरीक्षक
▪️ अनिल गुजर – पो. उप अधीक्षक
▪️विजयसिंग शिवलाल जोनवाल- स.पो. निरीक्षक
▪️महेश विघ्ने – पो. उप निरीक्षक
▪️आनंद शंकर शिंदे- पो.उप निरीक्षक
▪️तुळशीराम जगताप – सहा. पो. उप निरीक्षक
▪️मनोज राजेंद्र वाघ – पोलीस हवालदार
▪️चंद्रकांत एस.काळकुटे – पोलीस नाईक
▪️बाळासाहेब देविदास अहंकारे – पोलीस नाईक
▪️संतोष भगवानराव गित्ते – पोलीस शिपाई
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)















