12.2 C
New York
Saturday, May 2, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगावातील कार्यक्रम २ जानेवारी नंतर.

🔴राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगावातील शासकीय कार्यक्रम २ जानेवारी नंतर. 

शिवगर्जना न्यूज नांदेड :

नांदेड दि. २७ डिसेंबर भारताचे मा. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात २६ डिसेंबर ते १ जानेवारी सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे २९ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या माळेगाव येथील यात्रेतील शासकीय कार्यक्रम २ जानेवारी नंतर घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या संदर्भात आज जारी केलेल्या पत्रकामध्ये हा बदल जाहीर केला आहे.

दक्षिणेतील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेतील शासकीय कार्यक्रमांचे आयोजन नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायत मार्फत केला जातो.

◼️पालखी २९ डिसेंबरलाच

तथापी, पारंपारिक पद्धतीने स्थानिक देवस्थान संस्थान मार्फत तिथी नुसार निघणारी २९ डिसेंबर ची देव स्वारी व पालखीचे पूजन नियोजित वेळी म्हणजे २९ डिसेंबरला दुपारी २ वाजता होणार आहे. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

◼️अन्य कार्यक्रम २ जानेवारी पासून. 

मात्र २९ तारखे नंतरच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला असून आता सर्व कार्यक्रम २ जानेवारी नंतर होणार आहे. २९ तारखे पासून यात्रा नियमित सुरू असेल. मात्र जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित काही कार्यक्रमांमध्ये उलट फेर करण्यात आला आहे.

 ◼️२ जानेवारीनंतर चे कार्यक्रम. जिल्हा परिषद प्रशासनाने नव्याने जाहीर केलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.

२ जानेवारीला सकाळी दहा वाजता अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धांचे उद्घाटन होईल. महिला व बालकांसाठी विविध स्पर्धा सकाळी ११ वाजता दुपारी दोन वाजता कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व कृषी निष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे. तर दुपारी ३ वाजता लावणी महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. हे सर्व कार्यक्रम २ जानेवारी रोजी एकाच दिवशी वेग वेगळ्या वेळी घेण्यात येणार आहे.

३ जानेवारी सकाळी ११ वाजता आरोग्य शिबिर होणार आहे. तर याच दिवशी जिल्हा परिषदे मार्फत पारंपारिक लोक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता सुरू होईल.

 ४ जानेवारी रोजी सकाळी दुपारी १२ वाजता शंकर पटाचे (बैल जोडी, बैलगाडा शर्यत) आयोजित करण्यात आली आहे.

५ जानेवारी रोजी दुपारी अकरा वाजता पशु प्रदर्शन व दुग्ध स्पर्धा बक्षीस वितरण समारोह होणार आहे. तर ५ जानेवारीस दुपारी बारा वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे.

त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील कार्यक्रमाचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांच्या बदललेल्या तारखांना नागरिकांनी, भाविकांनी व श्रद्धाळूंनी लक्षात घ्यावे. राष्ट्रीय दुखवट्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, सहभाग ठेवावे, असे आवाहन, जिल्हा परिषद नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या