🔴 केदारवडगाच्या किर्तन व महाप्रसाद सोहळ्यात खा.वसंतरावजी चव्हाण यांची प्रकृती सुधरावी यासाठी डॉ.मिनल पाटील खतगावकर यांची केदारेश्वर मंदिरात प्रार्थना.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव
नायगाव विधानसभा मतदार संघात श्रावणातील तिसऱ्या सोमवार निमित्त डॉ.मिनलताई पाटील खतगावकर यांच्या वतीने केदार वडगाव येथील केदारेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या किर्तन व महाप्रसाद सोहळ्यात डॉ. मीनलताई पाटील खतगावकर यांनी नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारुन ते ठणठणीत पणे बरे व्हावे अशी प्रार्थना केली.
याप्रसंगी माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर सर्व सामान्य घटकातील जनतेला न्याय देताना कधीच दुजाभाव न करता सर्व समाजातील घटकांच्या न्याय हक्कासाठी आजपर्यंत जे सामाजिक व धार्मिक कार्य केले आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून डॉ. मिनलताई खतगावकर यांनी ही सतत गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करीत आहेत. त्याचबरोबर श्रावणातील दर सोमवारी विविध ठिकाणी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेव मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांना अन्नदान व ज्ञानदान करण्याचे कौतुकास्पद कार्य खतगावकर कुटुंबाचे सुरू असुन त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार रुपालीताई सवने परतुरकर यांनी आपल्या अमृतवाणीतुन व्यक्त केले.
नायगाव तालुक्यातील केदारेश्वर महादेव मंदीर केदारवडगाव येथे माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांच्या वतीने श्रावण मासाच्या तिसऱ्या सोमवार निमित्त दि. १९ ऑगस्ट रोजी किर्तन सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी उपस्थित शिवभक्तांना त्यां बोलत होत्या.
राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कामासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आपल्या भागाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास करून घ्यायचा असेल तर सर्व घटकांनी राजकीय रागलोभ दूर ठेवून विकासात्मक प्रश्नांकडे लक्ष देणाऱ्या डॉ.सौ.मीनलताई पाटील खतगांवकर या युवा नेत्यांना आपण सर्वांनी प्रोत्साहन देऊन या भागाच्या आमदार म्हणून संधी दिली पाहिजे असे आवाहन रुपाली ताई सवने यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अविनाशराव घाटे,नरसिंह सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब पाटील खतगावकर, नायगाव विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय नेत्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ.मीनलताई पाटील खतगावकर, कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबुराव पाटील भाले यांच्या सह आदींची उपस्थिती होती.
केदारनाथ महादेव प्रतिरूप असलेल्या केदारेश्वर महादेव मंदिरात खतगावकर कुटुंबीयांनी महापुजा केल्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला.
मंदिर कमिटीचे अध्यक्ष व्यंकटराव बाबुराव पा. जाधव यांच्या हस्ते खतगावकर कुटुंबाचे स्वागत करून डॉ.मिनल पाटील खतगावकर यांना भावी आमदार म्हणून आशीर्वाद दिले.
यावेळी उमाकांत देशपांडे नावंदीकर, नंदू पा. रातोळीकर, शिवाजी पा. कुष्णूनूरकर, निळकंठ पा. शिंदे मांजरमकर, संभाजी पा.माजरमकर, पोलिस निरीक्षक मुंडे, प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडेय, प्राचार्य शेळके, मुख्याध्यापक धोंडीबा वडजे, गजानन जुन्ने, व्यंकटराव पालकर, शिवाजी पा. शिरूरकर, दत्ता पा. होटाळकर, प्रा.जीवन चव्हाण, सुरेश पा. खंडगावकर, दिगांबर पा खंडगावकर, मारोती दगडे, आनंदराव शिंदे नागणीक, मलिकार्जुन आप्पा गडगेकर, बन महाराज, सुधाकर पा. मुकासदरेकर, धोंडीबा पा. कामरसपल्लीकर, संजय भांगे, रामेश्वर सवणे, याचबरोबर दिलीपराव माधवराव जाधव, शिवाजीराव मारोतराव जाधव, नागेश आनंदराव जाधव, तिरुपती दत्ताराम जाधव, अविनाश गोविंदराव जाधव, उद्धवराव अंबाजी जाधव, सरपंच सौ.उषाताई मोरे, उपसरपंच कैलासराव सदाशिव जाधव, हणमंतराव तोंडे, संतोष पा. पुय्यड, सदाशिव पा, डाकोरे यांच्यासह हजारोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
केदारेश्वर महादेव मंदिर परिसरातील नागरिकांच्या वतीने डॉ. मिनलताई खतगावकर यांचा भावी आमदार म्हणून भव्य सत्कार करण्यात आला. महादेव मंदिरात कीर्तन,भजन, महा आरती व अन्नदान अशा विविध कार्यक्रमांनी मंदिराचा परिसर भक्तिमय झाला होता.