🔴 शेकडो गावांना वरदान ठरत आहे मध्यप्रदेश मधून येणारी रावेर तालुक्यात सुकी नदी.
शिवगर्जना न्यूज,
सुरगाणा प्रतिनिधी : दिनेश गावित
लोहारा तालुका रावेर, सुकी नदी तापी नदीची उप नदी मानली जाते. ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. मध्यप्रदेशातील काकरा गावाजवळ सुकी नदीचा उगम आहे. निमाड च्या जंगलातून वाहत महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाल, गारबर्डी ते लोहारे व तेथून गौरखेडा, वडगाव ते तांदलवाडी पर्यंत ती वाहते व तांदलवाडी जवळ तिचा तापी नदीशी संगम होतो. सुकी नदी ही मध्यप्रदेशातील सातपुड्यातुन वाहते. झिरण्या तालुक्यातील हेला पडावा जवळील काकरा येथुन सुकी नदी उगम पावते. काकरा पासुन ते तांदलवाडी पर्यंतच्या अनेक ठिकाणांहुन ती वाहत जाते. बोरव्हाय, भडीक, खडक्यानदी, शेंड्या आंजन, पाल, पालची नागझीरी, सुकी धरण, पाकीट, उंबयला, नाजगरा, भुत्या, कायाडहु, पारधा, भळीक, चिचडहु, घोळीची धोंडी, मोठा असाबा, वगारचा खोदरा, लोहारा धरण(बंधारा), पाकीट, पाटी, पिपडहु, धनगर्या, चंभारडाब, पानथा, तवल्या, तळवल्या, गौरखेडा, वडगाव ते तांदलवाडी इ. ठीकाणांहुन वाहत तांदलवाडी जवळ तापी नदीशी तिचा संगम होतो.
◼️ नागझीरी
प्राचिन काळातील ऐतिहासीकतेचा उत्कृष्ट असा नमुनेदार झरा “नागझीरी” पण याच सुकी नदीवर आहे. आदिवासी तडवी भिल समाजाचे ऐतिहासीक केंद्र समजले जाणारे पाल हे गाव याच सुकी नदीवर वसले आहे.
◼️ नाजगरा
डोळ्यांचे पारणे फेडणारा निसर्गरम्य व अद्भुत असा चमत्कारीक धबधबा “नाजगरा” हा याच सुकी नदीवर आहे. प्राचिन काळातील बांधलेल्या सात विहीरी या नाजगरा याच धबधब्यात गाडल्या गेलेल्या आहेत. सात बहीणी म्हणुन म्हणुन ही त्यांची ओळख आहे. नाजगरा बद्दल तडवी भिल समाजाच्या अख्यायीका पण ऐकायला मिळतात. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या धबधब्याची पाहणी करून यांनी भेट दिली होती. नाजगरा येथे औष्णीक विद्युत केंद्र उभारण्याचा त्यांचा मानस होता. स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांनी १९७८ या वर्षी गारबर्डी या ठिकाणी याच सुकी नदीवर “सुकी धरण” बांधले. तसेच लोहारा येथील सुकी धरण (बंधारा) याच नदीवर आहे.
◼️असाबा
आदिवासी तडवी भिल समाजातील सर्वात जुने व मोठे असे ऐतिहासिक स्मशानभूमी (मोठा असाबा) हे याच सुकी नदीवर आहे. तडवी समाजातील सर्वात मोठे लोहारे हे गाव याच नदी किनारी वसले आहे.
जगात अनेक मानवी संस्कृतीचा उगम हा नद्यांपासुन झाल्याचे आपण पाहतो. अनेक ऐतिहासिक शहरे, नगरे व गावे ही नद्या किणारीच विकसीत झाल्याचे दिसुन येते. नदी कीनारी च मानवाचा विकास झाला. त्याच प्रमाणे सुकी नदीच्या किनारी देखील अनेक तडवी भिल या आदिवासींची संस्कृती व अनेक गावे विकसीत झाल्याचे आपल्याला दिसुन येते. पिढी जामली, काकरा, शेंड्याआंजन, कुंभारबर्डी, हेलापडावा, बोरव्हाय, पाल, मोंढ्याचार, चिचली, जुनी गारबर्डी, गुली, लोहारा, तळवडा, गौरखेडा, वडगाव ही पुर्वीची जुनी गावे तडवी भिल समाजानेच वसविली. यात काही गावे उजाड झाली. पण आजही आपल्या संस्कृतीची नाळ ही सुकी नदीशी जोडलेली आहेच. इंडियन रोबिनहुन तंट्या मामा भिल सिरसाठे यांचे झिरण्या तालुक्यातील गढी कोठडा हे गाव देखील सुकी नदीच्या किनारी आहे.
सातपुडा च्या सान्निध्यात गटाच्या समूहाने वस्ती करुन राहणारा तडवी भिल समाजातील काही वस्त्या १६ व्या शतकात लोहारे या ठिकाणी स्थीरावल्या नंतर येथे पाण्याची टंचाई असल्याचे आपण ऐकतो. अगोदर येथे उन्हाळ्यात नदीचे पाणी व झरे आटल्याने पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असे जाणकार सांगतात. असे ही सांगीतले जाते की पाण्या करीता या गावातील मुलांसाठी समाजातील आपल्या मुलींची लग्न करायला मागेपुढे करत असत. वधु भेटणे कठीण होत असे. सुकी नदी वरती धरण बांधल्या नंतर च्या काळात सुकी नदी ही तालुक्यातला जलवाहीनी वरदान ठरली हे आपल्याला दिसते. हजारो हेक्टर जमीन ही सिंचना खाली आली. जमीन सुपीक झाल्याने रावेर तालुक्याला केळीच्या बागांसाठी जग प्रसिद्धी ही सुकी नदी मुळेच मिळाली. तालुक्याची नाईल नदी म्हणुन या नदीच्या बाबतीत म्हटले तरी वावगे ठरु नये.