🔴 सांगली जिल्हाधिकारी कार्यालय निदर्शन आंदोलन व निवेदन देण्यात आले.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक जि. प्रतिनिधी : श्याम जाधव
सांगली : आज मंगळवार दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी सांगली महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन आंदोलन करण्यात आले. त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे —
१) राज्यातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीत वर्षानुवर्षे नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेल्या सुमारे ४२,००० वीज कंत्राटी कामगारांना पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असतानां च्या शासन मान्यता प्राप्त रोजंदारी कामगार पद्धती (Nominal Muster Roll) द्वारे त्या काळात कंत्राटदार विरहित रोजगार दिला जात होता. त्याच पद्धतीने तिन्ही वीज कंपनीत वर्षानुवर्षे नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेल्या वीज कंत्राटी कामगारांना रोजगार देण्यात येऊन त्यांना सेवेत सामावून घ्यावे. संघटनेच्या या मागणी नुसार २०१५ साली रानडे समितीची स्थापना तत्कालीन माजी ऊर्जामंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्या अहवालाची अंमलबजावणी करावी अथवा हरियाणा राज्यात ज्या पद्धतीने सर्व कंत्राटी कामगारांनां कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार दिला त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार मिळावा.
२) तिन्ही वीज कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांना स्वतंत्र वेतन श्रेणी तातडीने लागू करून संघटनेने १८/०९/२०२३ रोजी दिलेल्या एप्रिल २०२३ ते मार्च २०२८ साठी चे वेतनवाढ मागणी पत्रा नुसार वेतन वाढ लागू करून दि. १३ मार्च २०१९ च्या इतिवृत्तांता नुसार तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना एक समान वेतन द्यावे. अश्या अनेक मागण्या संदर्भात आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी सेवक कामगार संघटना सदैव पाठिशी राहील अशी ग्वाही संघटनेकडून देण्यात आली. त्यावेळेस संस्थापक अध्यक्ष उमरफारुक ककमरी, सांगली जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे, शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम आणि सोबत अनेक कामगार उपस्थितीत होते.