11.6 C
New York
Wednesday, April 29, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️रात्री अपरात्री चोरट्या वाळू वाहतुकीस कुणाचे सहकार्य…..

🔴 रात्री अपरात्री होणाऱ्या चोरट्या वाळू वाहतुकीला कुणाचे सहकार्य…..

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर प्र. ९९२३०७२२४२

तालुक्यातील विविध वाळू डेपोतून चोरट्या मार्गाने होणाऱ्या वाळू वाहतुकीला सध्या उत आल्याचे स्पष्ट दिसत आहे. वाळू वाहतूकीस महसूल प्रशासनासह पोलीस यंत्रनेचे पाठबळ तर नसेल ना? असा सवाल दबक्या आवाजात नसून मोठ्या आवाजात होताना दिसून येत आहे. कारण शासनाने गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून केवळ ६०० रु. ब्रास प्रमाणे रेती उपलब्ध करून देण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. मात्र या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवताना यासाठी लागलेली यंत्रणा अत्यंत कुचकामी ठरत असल्याचे चित्र सध्या रात्री अपरात्री होणाऱ्या चोरट्या वाळू वाहतुकीने दिसून येत आहे. वाळू माफिया संबंधित प्रशासनास हाताशी धरून आपणच प्रशासक आहोत अशा आविर्भावात बिनधास्तपणे चोरटी वाळू वाहतूक होत आहे.

महसूल प्रशासनाने नुकतेच अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे एक टिप्पर ताब्यात घेतले. या टिप्पर मध्ये कमीत कमी १० ते १२ ब्रास एवढी वाळू दिसून येत आहे. म्हणजेच कुण्या एका गरीबाच्या घराचे स्वप्न या चोरट्या वाळू वाहतुकीने भंगले नसेल का? गरिबाने घराचे स्वप्न पाहूच नये का? तालुक्याचे तहसीलदार या वरती नियंत्रण आणण्याचे कसेबसे प्रयत्न करतात. मात्र यंत्रणा अनेक वेळा हाताबाहेर जात असल्याने वाळू वाहतुकीस जोर आल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. म्हणून प्रत्यक्षरीत्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनीच या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाळू माफिया वरती कार्यवाही करावी. व या चोरीस सहाय्य करणारे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी. अशी ही मागणी जनतेतून होताना दिसूत येत आहे. जेणे करून गरीबाच्या घराचे स्वप्न भंगणार नाही. तत्कालीन कर्तव्यदक्ष सहा. जिल्हाधिकारी कुलदीप जंगम तबादल्यानंतर केवळ एका वाहनास ताब्यात घेण्यात महसूल यंत्रणाला यश आले. मागील काळात सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी शेकडो वाहनावर कारवाई करून दंडाच्या स्वरूपात महसूलच्या तिजोरीत भर टाकले होते. आता मात्र कोलमडलेली महसूल यंत्रणा व उच्च पदस्थ अधिकारी वसुलीच्या मार्गांवर असल्यानेच अवैध वाळू वाहतुकीला ऊत आला आहे. अशी चर्चा मात्र दबक्या आवाजात होते आहे. मध्यरात्री ०२ वाजता पासून ते सकाळी ०७ वाजे पर्यंत शेकडो वाहनात भरगच्च वाळू भरून परप्रांतीय राज्यात चढ्या भावात विक्री करण्यात येत आहे. वाळू चोरी मध्यरात्री २ ते सकाळी ७ वा. पर्यंत महसूल व पोलीस यंत्रने मार्फत दक्षता घेणे अगत्याचे ठरते. शिवाय दि.०६/०७/२०२४ रोजी एका बड्या अधिकाऱ्याच्या वाहनाने कडक पहारा देतात तब्बल ५५ ते ६० मोठ्या गाड्यातून होणारी चोरटी वाळू वाहतूक थांबली होती हे विशेष! म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन चोरटी वाळू वाहतुक थांबवावी. अशी मागणी जनतेतून मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. याशिवाय महसूल व पोलीस प्रशासनाने गरिबांच्या घरासाठी असलेली वाळू चोरी न होऊ देता हक्काने त्यांना मिळवून देण्याचे प्रयत्न करणे अगत्याचे ठरत असल्याचे ही सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या