
🔴 नायगांव मतदार संघ आमच्या हक्काचा आणि कॉग्रेस पक्षाकडूनच लढविणार.
शिवगर्जना न्यूज,
नायगांव ता. प्र. : दिपक गजभारे
८९-नायगांव विधानसभा मतदार संघ निर्मीती पासून नायगांवकर चव्हाण परिवारांचा असून गेली १५ वर्षापासून चव्हाण परिवाराने नायगांव मतदार संघातील उमरी, धर्माबाद, नायगांव येथील जनतेचे १० वर्षे प्रतिनिधीत्व केले असून कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली आहे आणि ती सेवा अद्याप चालूच आहे. याच माध्यमातून कॉग्रेस पक्षाची विचारधारा ग्रामीण, शहरी, जनतेमध्ये रूजवून सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची अखंड परंपरा नायगांवकर चव्हाण परीवारांनी जपली आहे. खासदार वसंतराव चव्हाण यांनी मागील एक दशका पासून नायगांव विधान सभेची नेतृत्व केले असून. त्यांच्या च माध्यमातून त्यांचे चिरंजीव प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण हे सूध्दा जनतेच्या सूख दुख:त व लोकोपयोगी कार्यक्रमात अहोरात्र कार्य करीत आहेत.तसेच ते जनतेच्या थेट संपर्कात आहेत.
इतर पक्षातील काही इच्छूक उमेदवार किंवा त्यांचे नेते नायगांव मतदार संघात चव्हाण परिवारा बद्दल निवडणूकीच्या माध्यमातून वेगळा संभ्रम निर्माण करीत आहेत. ती खोटी अफवा पसरवून आमच्या कॉग्रेस पक्षाच्या व आघाडीच्या कार्यकर्त्यांना भ्रमित करण्याची प्रक्रिया राबवीत आहेत. हे फसवे राजकारण असून येणारी नायगांव विधानसभा ही कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण हेच लढवतील हे ठाम असून कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या खोटया अफवेला बळी पडू नये. येणाऱ्या विधानसभेचे नेतृत्व चव्हाण परिवाच करणार आहे आणि तेच विधान सभेचे दावेदार आहेत. असे कळविण्यात येते.
आपले संजय माधवराव बेगळे, प्रल्हाद पा.इज्जतगांकर, गोविंद पा.रोषणगांवकर, ता.अध्यक्ष कॉ.क.नायगांव, ता.अध्यक्ष कॉ.क.नायगांव प्रभारी, ता.कॉ.क.धर्माबाद.















