
🔴 नायगांव येथील शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला.
नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव
(नांदेड ) नायगांव तालुक्यात समाजकार्य सदैव अग्रेसर असणाऱ्या शिष्टमंडळांनी मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची आज भेट घेतली.
आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या महत्वपूर्ण चर्चे करीता नायगांव विधानसभा मतदार संघातील शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले. काही दिवसांपूर्वीच या शिष्टमंडळाने श्री क्षेत्र महादेव मंदिर गंगणबीड येथे निर्धार बैठक आयोजित केली होती.
जर जरांगे पाटील यांनी नायगांव विधानसभेला उमेदवार दिला तर नक्कीच स्थानिक राजकारणातील समिकरणे बदलतील. मागे झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुपडा साफ हा आदेश दिल्यानंतर सर्वांनी तळमळीने काम केले आणी स्वप्नातही विचार केला नसलेल्यांना खासदारकी मिळाली. यापुढे काय होईल..? उमेदवारी कोणाला मिळेल..? अशी चर्चा मतदारसंघात चालु असतानांच ह्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
यावेळी हानमंत पाटील शिंदे, रणजीत देसाई, गजानन पा. कदम, राजेश पा. मोरे, रितेश पा. कल्याण, बळवंत पा. शिंदे, परमेश्वर पा. कदम आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.















