9.8 C
New York
Sunday, May 3, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन, तर लाडक्या बहिणी चिंतेत..

🔴 चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन, तर लाडक्या बहिणी चिंतेत..

शिवगर्जना न्यूज,
उमरी प्रतिनिधि:- महेश पडोळे

शासनाने महिलांना दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे सर्व्हर मागील चार दिवसांपासून डाऊन झाले आहे यामुळे योजनेचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. परिणामी ग्रामीण भागातील अनेक महिलांनी ३१ ऑगस्ट शेवटची तारीख समजून शेतीतील कामामुळे, कागद पत्रे पूर्ण नसल्या कारणाने अद्याप अर्ज दाखल केला नव्हता परंतु अर्ज भरण्याच्या अंतिम तारीखे अगोदरच सर्व्हर डाउन झाल्यामुळे ग्रामीण भागातील महिला योजनेपासून वंचित राहतो की, काय? अशी चिंता त्यांना लागली आहे. याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी वरिष्ठांशी चर्चा करून तात्काळ मार्ग काढावा अशी मागणी लाभार्थ्या कडून होत आहे दोन दिवसापूर्वी आलेले पोर्टल ९०% सुरळीत सुरू नाही यामुळे ५०% पेक्षा अधिक महिलांचे अद्याप अर्ज भरणे बाकी आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या