11.4 C
New York
Tuesday, November 3, 2026

Buy now

spot_img
spot_img

संपादकाचा वारसा : वृत्तपत्रसृष्टीतील सुवर्ण युगाची साद — किरजवळेकर

🔴 संपादकाचा वारसा : वृत्तपत्रसृष्टीतील सुवर्ण युगाची साद — किरजवळेकर

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर :

मराठवाडा विदर्भ हे साप्ताहिक सुरू करण्याचे कारण माझे वडील श्रीराम शंकरराव किरजवळेकर, महाराज यांनी १९६० या इसवी सन. श्री संत गाडगेबाबा शिक्षण प्रसारक मंडळ देगलर एफ ३८ या नावाने या भागात ही संस्था सुरु करून मदनेश्वर विद्यालय मशनेर या भागात पहिली शाळा काढण्यात आली. या नंतर साधना हायस्कूल देगलूर, ज्ञानप्रभा कन्या शाळा देगलूर, साधना प्राथमिक देगलूर, नेताजी सुभाष विद्यालय तमलूर, पंचपुरा विद्यालय मालेगाव, यशवंत विद्यालय नरंगल तसेच मुखेड तालुक्यातील अंबुलगा, रावनगाव नांदेड तालुक्यात काकांडी येथे पवित्र ज्ञानासाठी शिक्षण संस्था चालू करून या भागातील जनतेला शिक्षणाची दारे खुले करून देण्याचे काम केले.

देगलूर हा भाग आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटकच्या सीमेवर वसलेला असून ईथे फार मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा होती. श्री संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेने १९३५ पासून येथे बकऱ्यांचा बळी दिला जात होता ही प्रथा बंद करण्याचे काम श्रीराम महाराज किरजवळेकर यांनी गाडगे बाबाच्या सांगण्यावरून त्याच भागात थांबून मशनेर येथे थांबून बकऱ्यांचा बळी देण्याचे काम बंद करण्यात आले व शाळा सुरू करण्यात आली.

🎯 श्री संत गाडगे बाबांच्या सानिध्यात असलेले..

गुणवंतराव सूर्यवंशी महाराज गोजेगावकर ता. मुखेड जि. नांदेड यांचा नातू (शिवगर्जना न्यूज संपादक शहाजी नारायणराव वरखिंडे) भीमराव महाराज तसेच श्रीराम महाराज किरजवळेकर

श्रीराम महाराज हे जास्त शिकलेले नव्हते परंत गाडगे बाबाच्या सानिध्यात आल्यामु‌ळे अंधश्रद्धा मोडून काढणे. शिक्षण घेतल्याशिवाय माणसाच्या जीवनात प्रगती होत नाही. हे ते आपल्या कीर्तनातून सांगत असत. 

तसेच शिक्षणा बरोबर १९७४ वर्षी या भागातील जनतेचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी व जनतेला आपले विचार सांगण्यासाठी वृत्तपत्र काढण्याचा विचार त्यांच्या मनात आला. व मारुती पाटील राजूरकर, आर्यन गजभारे, पि.के. सोनकांबळे, वाय.जी. सोनकांबळे, हनमंत खंडागळे, श.ल. नाईक, गंगाराम गोपछडे, अशा अनेक वृत्तपत्र या विषयाशी संबंधित असलेल्या त्यांच्या लोकांशी चर्चा करून मराठवाडा विदर्भ हे साप्ताहिक काढण्याचे धाडस १९७४ या इसवीसनात करण्यात आले. बरेच वर्षे हे साप्ताहिक चालवल्यानंतर वैयक्तिक कारणीभूताने हे साप्ताहिक बंद होते. पण माझी मुलगी ॲड. निकिता किरजवळेकर यांनी हे वृत्तपत्र चालू करावे, अशी इच्छा व्यक्त करत वृत्तपत्र काढण्याचे सातत्याने माझ्याकडे मागणी होती. मलाही वाटले आपण हे साप्ताहिक चालू करू, नव्याने सुरू होणारे साप्ताहिक केवळ एक वृत्तपत्र नसून सर्वसामान्य जनतेच्या अशा अपेक्षा आणि सामान्य सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उभा करण्याचा संकल्प घेऊन सुरू करत आहोत.

ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, युवक तसेच दुर्लक्षित घटकांचा आवाज बळ देत समाजाची वास्तव मान्य केली. साप्ताहिक “मराठवाडा विदर्भ” ने स्वीकारले आहे. पक्ष निर्भीड आणि लोकहितवादी पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून प्रशासनापर्यंत पोहोचण्याचे कार्य “मराठवाडा विदर्भ” सातत्याने करेल असा विश्वास व्यक्त करतो.

आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक यूगात सत्य, विश्वास आणि सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकारिता काळाची गरज बनली आहे. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून मराठवाडा विदर्भ हे साप्ताहिक समाजातील सकारात्मक बदलासाठी कटिबद्ध राहणार आहे. स्थानिक घडामोडी पासून राज्य देश आणि विविध क्षेत्रातील घडामोडीवर अचूक व वस्तुनिष्ठ वृत्तांकन करताना सामान्य माणसाच्या हिताला वाल दिले जाईल. तसेच कुठल्याही कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही याची दक्षता घेऊन हे साप्ताहिक आपल्या सेवेत रुजू होत आहे.

• मुख्य संपादक: श्री शहाजी वरखिंडे

मो. 9923072242

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या