⚫ आशाताई राजीव ताटे यांचे दुःखद निधन.
देगलूर प्रतिनिधी
देगलूर येथील बापूनगर मधील रहिवाशी तथा साधना शाळेतील सहशिक्षक राजू बापूराव पा. ताटे यांच्या पत्नी आशाताई राजीव ताटे यांचे कर्करोगाने गुरुवार दि. २२ रोजी रात्री येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ४६ वर्ष होते. त्यांच्यावर शुक्रवार दि.२३ रोजी सकाळी ११ वाजता देगलूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा एक मुलगी, सासू-सासरे, यांच्यासह इतर मोठा परिवार आहे. येथील जिजाऊ ब्रिगेडच्या संजीवनीताई सूर्यवंशी यांच्या त्या भावजय तर शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. आनंद जाधव हाळीकर यांच्या त्या चुलत भगिनी होत. येथील दैनिक लोकमतचे शहर प्रतिनिधी राजीव ताटे यांच्या त्या पत्नी होत.
💐💐ओम शांती… भावपूर्ण श्रद्धांजली….💐💐