🙏🌹 *सुप्रभात.* 🙏🌹
आज रोजी आंतरवली येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित सभे करीता उपस्थित झालेल्या सर्व समाज बांधवांचे मन:पूर्वक अभिनंदन व धन्यवाद. सर्व समाज बांधवानी खालील सुचनाचे आपल्या स्वतः करीता व समाजा करीता पालन करण्यास नम्र विनंती आहॆ.
1) सभेच्या ठिकाणी शिस्तीचे पालन करावे.
2) कोणत्याही समाजाचा /व्यक्तीचा अपमान होईल असे आक्षेपार्ह विधान किंवा घोषणा करू नये.
3) सभेमध्ये गर्दीमुळे चेंगरा चेंगरी होणार नाही याची दक्षता घ्यावी. वृद्ध, माता, भगिनी व लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी मदत करावी.
4) रात्रीचा प्रवास शक्यतो टाळावा.
5) प्रत्येक समाज बांधवानी कोणत्याही नशेचे सेवन करू नये, प्रवासी वाहणाच्या चालकाने कोणतेही नशेचे सेवन करू नये व वाहन चालकाला रात्रीचा प्रवास जास्त होणार नाही याची काळजी घेऊन त्यांना योग्य ती विश्रांती दयावी.
6) सभेच्या ठिकाणी व नंतर देखील कोणाशीही वाद विवाद करू नये असे कोणी करीत असतांना आढळून आल्यास त्याबाबत माहिती पोलिसांना दयावी.
सर्वांचा प्रवास सुखाचा होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
एक मराठा लाख मराठा.















