12.4 C
New York
Sunday, November 1, 2026

Buy now

spot_img
spot_img

*शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी बस सेवा तात्काळ सुरळीत करा…* – कैलास येसगे कावळगावकर *उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व आगार प्रमुखांची भेट घेऊन केली आग्रही मागणी…* *व तहसीलदारांनी तात्काळ बैठक बोलवून सोडवल्या अडचणी…* ग्रामीण भागातून देगलूर येथे शाळेला येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना बस सेवेच्या दुरावस्थेमुळे नाहक त्रास होतो आहे. *अनेक ठिकाणी बस सेवा सुरळीत नाही, काही ठिकाणी बसेस थांबत नाहीत व अवेळी बसेस असल्यामुळे मुला मुलींना अक्षरशः रात्री सात ते आठ वाजता घरी पोहोचण्यास उशीर होतोय, अशा सगळ्या अडचणी घेऊन वझरगा व परिसरातील अनेक पालक आज माझ्याकडे आले.* त्यांना घेऊन प्रथम उपजिल्हाधिकारी कार्यालय तदनंतर आगार प्रमुख यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर *तहसीलदार मा. राजाभाऊ कदम यांनी आगार प्रमुखांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेऊन आमच्या सगळ्या अडचणी ऐकून घेऊन त्या तात्काळ सोडवण्याबाबत सक्त आदेश आगार प्रशासनाला दिले व त्यांनी सुद्धा मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष बस पाठवण्याचा शब्द दिला.* या कामी *आमचे गुरु व पत्रकार शिवानंद स्वामी सर व मानव विकास विद्यालयाचे * यांचे विशेष मदत व मार्गदर्शन मिळाले. *एखाद्या कामासाठी ग्रामीण भागातील लोक आपल्याकडे आशेनं येतात आणि ते काम तातडीने मार्गी लागतं तेव्हा आलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर काम झाल्याचा जो आनंद दिसतो, ते हास्य व तो आनंद खूप ऊर्जा देऊन जातं..!* *कैलास येसगे कावळगावकर*

*शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी बस सेवा तात्काळ सुरळीत करा…*
– कैलास येसगे कावळगावकर

*उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व आगार प्रमुखांची भेट घेऊन केली आग्रही मागणी…*
*व तहसीलदारांनी तात्काळ बैठक बोलवून सोडवल्या अडचणी…*

ग्रामीण भागातून देगलूर येथे शाळेला येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना बस सेवेच्या दुरावस्थेमुळे नाहक त्रास होत आहे. अनेक ठिकाणी बस सेवा सुरळीत नाही तर काही ठिकाणी बसेस थांबत नाहीत व अवेळी बसेस असल्यामुळे मुला मुलींना अक्षरशः रात्री सात ते आठ वाजता घरी पोहोचण्यास उशीर होतो. अशा सगळ्या अडचणी घेऊन वझरगा व परिसरातील अनेक पालक आज माझ्याकडे आले असता. पालकांना घेऊन प्रथम उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि आगार प्रमुख यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर तहसीलदार मा. राजाभाऊ कदम यांनी आगार प्रमुखांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेऊन आमच्या सगळ्या अडचणी ऐकून घेऊन त्या तात्काळ सोडवण्यास सक्त आदेश आगार प्रशासनाला दिले. तात्काळ मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष बस पाठविण्याचा शब्द दिला.

या कामी पत्रकार शिवानंद स्वामी यांचे सहकार्य मिळाले.

एखाद्या कामासाठी ग्रामीण भागातील लोक आपल्याकडे आशेनं येतात आणि ते काम तातडीने मार्गी लागतं तेव्हा आलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर काम झाल्याचा जो आनंद दिसतो, ते हास्य व तो आनंद खूप ऊर्जा देऊन जातं.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या