22.8 C
New York
Friday, September 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीराम नवमी शोभा यात्रा मध्ये उस्ताहात साजरी श्रीरामाच्या जय घोशाने

🔴 श्रीराम नवमी शोभा यात्रा नायगाव मध्ये उस्ताहात साजरी. 

♦️श्री रामाच्या जय घोशाने नायगाव नगरी दुमदुमली. 

शिवगर्जना न्यूज, 

नायगाव बाळासाहेब पांडे

नायगांव शहरात प्रती वर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक १७ मे रोजी श्रीराम जन्मोत्सव व भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी पाच वाजता राजुरा हनुमान मंदिर येथे श्रीराम पूजन व आरती करून शोभा यात्रेची सुरुवात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, उपनगराध्य विजय पाटील चव्हाण या सह मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. रोकडेश्वर मंदिर एरिक्सन कॉलनी समोर माधव कल्याण यांच्या पुढाकारातून महाप्रसाद वाटप तर धनराज शिरोळे यांच्या कृष्णा दूध डेअरी समोर मठा वाटप कार्यक्रम घेण्यात आला.या 

उपक्रमाचे उद्घाटन शिवराज पाटील होटाळकर, डीवायएसपी किरण पोपळघट, पोलिस निरीक्षक मारकड, उद्योजक सुभाष पाटील कल्याण, सेनेचे माधव कल्याण, भाजपा माधव कल्याण, राष्ट्रवादी संजय चव्हाण, कल्याण, पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर, बाळासाहेब पांडे, नीलकांत विलास धुपेकर, माधव पाटील उपासे आदीच्या हस्ते करण्यात आले.

 शोभा यात्रेचे मुख्य आकर्षण श्रीराम मूर्ती, हनुमान मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती यांसह एल.ई.डी. लाईट डी जे साउंड त्यावर तरुणांनी ताल ठेक्यात केलेलं नृत्य हे ठरले. 

शोभायात्रा मार्गावर जागोजागी थंड पिण्याच्या पाण्याची सोय, मठा, खिचडी वाटप, दानशूर व्यक्ती कडून करण्यात आले होते. ही यात्रा डॉ हेडगेवार चौक, शिवाजी चौक, नगर पंचायत, मार्गे श्रीराम मंदिरात आरती करून सांगता करण्यात आली. जिल्हाभरातून हाजारो रामभक्त शोभायात्रेत सहभागी झाले होते.

श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष रामभक्त श्री कैलास पाटील शिंदे, उपाध्यक्ष सचिन पाटील कल्याण, सचिव पाटील शिंदे, कोषाध्यक्ष शिवम पाटील कल्याण, राहुल चव्हाण, विशाल कागदेवाड सुनील मालेगावे, परमेश्वर कदम शिवा रामदिनवार विजय शिंदे या सह श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती भक्त गण नायगांव यांनी शोभा यात्रा यशस्विते साठी प्रयत्न केले. 

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या