⚫ अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सदस्य गोविंदप्रसाद झंवर यांचे निधन
शिवगर्जना न्यूज,
देगलूर : प्रतिनिधी
अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सदस्य गोविंद प्रसाद झंवर (पप्पू सेठ) यांचे दुःखद निधन झाले आहे. ते देगलूर आणि मदनुर परिसरामध्ये एक प्रतिष्टीत व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते. देगलूर येथील रुग्णसेवा मंडळाचेही ते सदस्य होते. त्यांचे वय ६५ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी व नातवंड असा परिवार आहे. अंत्यविधी दिनांक ३० मार्च २०२५ रोजी मदनुर येथे ठीक १०.०० वाजता होणार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाबदल
अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ. कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य देवेंद्र मोतेवार, नारायणराव मैलागिरे, सूर्यकांत नारलावार, गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ, उप प्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य एम एम चमकुडे, उप प्राचार्य डॉ.व्ही. जी शेरीकर, पर्यवेक्षक श्री संग्राम पाटील, कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी शोक व्यक्त केले आहे.