16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️यात्रेच्या कुस्ती फडात लातुरच्या लवटेने मारली बाजी.

🔴 येवती यात्रेच्या कुस्ती फडात लातुरच्या लवटेने मारली बाजी.

◼️शेवटची कुस्ती उदगीर च्या धिरजचा पराभव करित लातुरच्या तुषार लवटे जिंकली. 

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव

नांदेडच्या मुखेड तालुक्यातील येवती येथील सुप्रसिध्द श्री. सद्गुरू नराशाम महाराज यात्रे निमित्त आयोजित केलेल्या कुस्ती फडात शेवटची कुस्ती आठ हजार रु. ची लातुर च्या तुषार लवटेने जिंकली असुन त्यांनी उदगीरच्या धिरजचा पराभव केला आहे. 

श्री सद्गुरू नराशाम महाराज यात्रे निमित्त दरवर्षी यात्रा कमेटी व समस्त गावकरी मंडळ यांच्या वतीने कुस्त्यांचे आयोजन केले जाते. यंदा दि. २१ जानेवारी २०२५ रोजी जंगी कुस्त्यांचे भव्य आयोजन केले होते. या आखाड्यात यंदा कुस्ती खेळण्यासाठी मराठवाड्यातील प्रसिद्ध हिंद केसरी पैलवान दाखल झाले होते. तर दुसरीकडे कुस्ती प्रेमींनीही कुस्त्या पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. 

श्री सद्गुरू नराशाम महाराज यात्रे निमित्त कुस्त्यांचे नियोजन गावातील पद्माकर पाटील येवतीकर, पंढरी पाटील गोपनर, रंजीत पाटील गोपनर, वसंतराव पाटील येवते, निळकंठराव सुभेदार, शिवाजी पिंपरे, हाणमंतराव पा सुडके, देविदास गुरुजी सुडके, बंडू पाटील सुडके, शिवाजी गुरुजी सुडके, संदीप पा सुडके, नरहरी नागरगोजे, शामराव नागरगोजे, संतोष सावकार, श्रीहरी पाटील नागरगोजे, पत्रकार विठ्ठल पाटील येवतीकर, राम सुडके, डॉ.कोडिंबा सुडके, कार्यकर्ते ज्ञानोबा पुंडलिक घाटे, शेख मैनोदीन येवतीकर, लक्ष्मण पाटील गोपनर, अखिल येवतीकर आदी मान्यवरांकडून केले जाते. यंदा अतिशय चांगल्या प्रकारे कुस्त्या शांततेत पार पडले असून यावेळी. मुखेड पोलिस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे आदेशाने बिट जमादार व्यंकट जाधव यांनी चोख असा बंदोबस्त ठेवला होता ‌तर दुसरीकडे गावकऱ्यांच्या वतीने पोलिस प्रशासनाचे आभार मानण्यात येते आहे.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या