
🔴 राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेची नुकतीच बिलोली येथील तालुका कार्यकारणी मोठ्या उत्साहात जाहीर करण्यात आली.
शिवगर्जना न्यूज,
बिलोली : प्रतिनिधी
राष्ट्रीय पत्रकार संघ भारत ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली असल्याने समस्त पत्रकारांचा या संघटनेकडे ओघ वाढलेला दिसून येत आहे. समाजातील विविध स्तरावर काम करणाऱ्या पत्रकारांना एकाच छता खाली घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असल्यानेच अल्पावधीतच राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेचे नाव सबंध भागात गाजत आहे शिवाय संघटनेच्या माध्यमातून केल्या गेलेल्या अनेक कामांना ओळखूनच पत्रकार आवर्जून संघटनेत सामील होत असल्याबाबतचे स्पष्टीकरण आज बिलोली तालुक्यातील तालुक्याचे अध्यक्ष तथा पदाधिकाऱ्यांनी निवडीच्या वेळी सांगितले. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. इर्शाद पटेल यांनी समस्त पत्रकारांना सखोल असे मार्गदर्शन करीत संघटनेचे महत्त्व लक्षात आणून दिले. व सर्व पदाधिकाऱ्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय पत्रकार संघटना भारत प्रदेशाध्यक्ष संदीप भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष ॲड. इर्शाद पटेल यांच्या नेतृत्वात देगलूर बिलोली तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
बिलोली तालुका अध्यक्ष म्हणून मा. ज्ञानेश्वर शिरगिरे यांची बिलोली तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर मा. विलास शेरे यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. दयानंद इरवंत भद्रे यांची तालुका सचिव, मा. गौतम पिराजी गावंडे यांची सहसचिव, मा. कपिल विजय, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. बिलोली येथील नव नियुक्त तालुका कार्यकारिणी निवडीच्या वेळी राष्ट्रीय पत्रकार संघाचे जिल्हा सचिव लक्ष्मण पवार, जिल्हा कार्याध्यक्ष मारुती कुडकेवार, जिल्हा संपर्कप्रमुख माणिक सूर्यवंशी.
देगलूर तालुका उपाध्यक्ष शहाजी वरखिंडे व तालुका सचिव सुभाष वाघमारे पत्रकार सय्यद रियाज यांची उपस्थिती होती. समस्त कार्यकारिणीवर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष तथा समस्त पत्रकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
भेदेकर यांची कार्याध्यक्ष, तसेच मा. गौतम गोपाळ वाघमारे यांची संघटक व गंगाधर शंकर ईबितकर यांची तालुका कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)















