19.7 C
New York
Friday, April 17, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️ राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन.

🔴 मुकेश चंद्रकार यांच्या हत्या निषेधार्थ राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन.

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी

नांदेड:- छत्तीसगडमधील विजापूरमध्ये पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यांच्या हत्येला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नांदेड अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले आहे.

देशात लोकशाहीचा चौथा स्तंभ असहाय्य झाला आहे.का..? पत्रकार समुदायाला खऱ्या व निर्भीड बातम्या प्रकाशित करण्याची किंमत सतत पत्रकारांना जीव धोक्यात घालून मोजावी लागत आहे. या देशातील सर्वात मोठी संघटना, राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेच्या पत्रकारांच्या हिताचे संरक्षण लक्षात घेऊन, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा संपूर्ण देशात त्वरित अंमलबजावणी लागू करावे या हेतूने नांदेड अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. 

पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह पोलिसांना ठेकेदार सुरेश चंद्राकर यांच्या अंगणात सापडला असा आरोप आहे. पत्रकाराची हत्या करण्यात आली आणि त्यांचा मृतदेह सेप्टि टँकमध्ये टाकण्यात आला, तेथे नंतर तो सापडला. पोलिसांना शरीरावर धारदार शस्त्राच्या जखमांच्या खुणा आढळल्या आहेत.

पत्रकार मुकेश हा दि.०१ जानेवारी पासून बेपत्ता होता, त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल करण्यास सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश आणि रितेश चंद्राकर हे कंत्राटदार बंधू रस्ते बांधणीत गुंतलेले आहेत आणि मुकेश यांनी नुकतेच रस्त्याच्या कामाच्या निकृष्ट दर्जाची तक्रार केली होती, त्यामुळे चौकशी सुरू झाली. या रिपोर्टिंगशी या हत्येचा संबंध असावा असा संशय आहे. मृतदेह सापडल्यानंतर रितेश चंद्राकर या कंत्राटदाराने घटनास्थळावरून पलायन केल्याचे समजते. या सदरील गुन्ह्यात जबाबदार असलेल्या सर्व दोषींना कठोर कारवाईचे आश्वासन पोलीस देत आहेत. तपास सुरू असून, या सदरील संदर्भातील दोषींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करून कठोर फाशीची शिक्षा देण्यायात यावे या उद्देशाने राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड मार्फत राष्ट्रपतींना दि.०९ जानेवारी २०२५ रोजी निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी मा. संदीप भालेराव महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष (रा. प. संघ भारत), मा. सुभाष अल्लापुरकर मराठवाडा अध्यक्ष तसेच

ॲड. इर्शाद पटेल जिल्हाध्यक्ष, मा. लक्ष्मण पवार जिल्हा सचिव, मा. मारोती कुडकेवार जिल्हा कार्याध्यक्ष, मा. शशिकांत पटणे जिल्हा उपाध्यक्ष, मा. माणिक सूर्यवंशी जिल्हा संपर्क प्रमुख, मा. विठ्ठल भंडरवार, जिल्हा कोषाध्यक्ष, मा. यादव ढाले जिल्हा सहसचिव, मा. सायलू कृष्णापुरे जिल्हा सदस्य, मा. योगेश जाकरे तालुका अध्यक्ष देगलूर, मा. शहाजी वरखिंडे तालुका उपाध्यक्ष, मा. सुभाष वाघमारे तालुका सचिव, मा. अझीम अन्सारी तालुका सहसचिव, मा. संतोष नामावाड तालुका संघटक, मा. पिराजी इबितवार तालुका सहसचिव सह सर्व राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे पदाधिकारी यांनी नांदेड अप्पर जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. 

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या