
🔴 मुक्रमाबाद व्हॉइस ऑफ मीडिया पदाधिकाऱ्यांची निवड.
शिवगर्जना न्यूज,
मूक्रमाबाद
मुक्रमाबाद शासकीय विश्रामगृहात दि. २९ डिसेंबर रोजी व्हाईस आफ मीडीयाची बैठक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सुरुवातीस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या बैठकीत सर्वानुमते व्हाईस आफ मीडीया शाखा मुक्रमाबाद ची नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये व्हाईस आफ मीडीया मुक्रमाबाद अध्यक्ष पदी रज्जाक कुरेशी तर सचिवपदी अशोक लोणीकर, कार्याध्यक्ष पदी जलील पठाण, उपाध्यक्ष रमेश राचलवार, संघटक मष्णाजी बाजगीरे, सहसचिव बालाजी दमकोंडवार, कोषाध्यक्ष शाकेर काझी, प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर राजूरे, सदस्य बस्वराज वंटगीरे, काशीनाथ इंदुरे, सदस्य गणेश अक्कुलवार, आदिंची निवड करण्यात आली. पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी व जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे यांच्याहस्ते निवडीचे नियुक्ती पञ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस भालचंद्र तिडके, अजित पवार, केशव रापतवार, बाबुराव वाघमारे, सतिश वाघमारे, आदि उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल सेवा सहकारी सोसायटी चेअरमन सुरेशदादा पंदीलवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गौसखाँ पठाण, सदाशीव बोयवार, शेतकरी संघटनेचे नेते शिवशंकर कलंबरकर, दिनेश अप्पा आवडके, आदिंनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे सूत्र संचलन पञकार रज्जाक कुरेशी यांनी केले तर मष्णाजी बाजगीरे, यांनी आभार मानले.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)















