
♦️बल्लूर फाटा – मानूर – राज्य सीमा रस्त्याचा प्रश्न जलद गतीने मार्गी लावावा – खा. चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर : प्रतिनिधी
देगलूर, महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भागातील बल्लूरफाटा ते बल्लूर – गवंडगाव – शिवणी – पेंडपल्ली – झरी – माळेगाव – (डावीकडे क्षीरसमुद्र – हाळी – बेंबरा तांडा ) – मरतोळी – अंबुलगा – भूतनहिप्परगा – सोमुर – बेंबरा – मानूर – गोगोतांडा ते राज्य सीमा रस्ता आजतागायत नादुरुस्त आहे. सदरील रस्त्याची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने व दुरुस्तीच्या नावा खाली लोक प्रतिनिधी व कंत्राटदाराच्या संगनमताने मंजूर रक्कमेची दर्जेदार कामे झाली नसल्याने या भागातील गावकऱ्यांना सतत प्रवासाबाबत गैरसोय निर्माण होत आहे. सदरील प्रलंबित रस्त्याबाबत तत्कालीन काँग्रेस खासदार कै. वसंतराव चव्हाण यांनी मानूर येथील जाहीर सभेत निवडून आल्यानंतर सदरील रस्त्याच्या कामासाठी प्रथम प्राधान्य देण्यासंबंधी चे आश्वासन दिले होते पण दुर्दैवाने त्यांचे दुःखद निधन झाल्याने ते काम प्रलंबित राहिले आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता व सीमावर्ती भागातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी म्हणून नांदेड जिल्ह्या नव निर्वाचित खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी प्रथम प्राधान्य देऊन रस्त्याच्या मजबूतीकरण कामास मंजूरी द्यावी. अशी मागणी राज्यसीमावर्ती भागातील गावकऱ्यांनी खासदारांकडे केली आहे. यावेळी उपस्थित ॲड. अंकुशराजे जाधव, विशाल पवार, शिवकुमार बिरादार, सचिन पाटील, वैभव पाटील, श्रीराम पाटील, विष्णू रेड्डी, दीपक रेड्डी, राहुल फिरंगे, राजू वाघमारे, राजू वाघमारे. आदी संघर्ष समितीचे सहकारी उपस्थित होते.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)















