16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️पोलिसांची दमदार कामगिरी तब्बल १ कोटी ५३ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त

🔴 इगतपुरी पोलिसांची दमदार कामगिरी

♦️तब्बल १ कोटी ५३ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त

शिवगर्जना न्यूज,
इगतपुरी : प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यात असलेल्या नांदगाव सदो समृद्धी महामार्गाच्या जवळ पोलिसांनी लावलेल्या चेकपोस्ट ठिकानी वाहनांची तपासणी करत असतांना ट्रक क्रमांक आर.जे. ११ जी सी ००९१ संशयास्पद आढळल्याने वाहनांची तपासणी करत असतांना पोलिसांना ट्रकमध्ये सुगंधित तंबाखू मिळाली आहे. ज्यामध्ये तब्बल एक कोटी ५३ लाख रुपये किंमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे.

मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पान मसाला सुगंधित तंबाखू हानिकारक असणारे खाद्यपदार्थांची विक्री उत्पादन साठवणूक वाहतूक करण्यास मनाई असल्याने त्या पार्श्वभूमीवर गुटख्याची वाहतूक विक्री वितरण व साठवणूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरू आहे.

त्या अनुषंगाने आज इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावरील टोलनाकाच्या जवळ असलेल्या पुलाखाली गुटखा वाहतूक करीत असलेल्या टाटा कंपनीचे ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.

या मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैद्यरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणाऱ्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वाहन चालक अरमान शोहराब खान रा.फिरोजपुर, हरियाणा वय वर्ष २० याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून भारतीय न्याय कलमा नुसार इगतपुरी पोलीस ठाण्यात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या