16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️उपप्राचार्य पदी प्रा.एम.एम. चमकुडे, डॉ.व्यंकटेश शेरीकर यांची नियुक्ती.

🔴 देगलूर महाविद्यालय देगलूर (कनिष्ठ) कला वाणिज्य शाखेच्या उप प्राचार्य पदी प्रा.एम.एम. चमकुडे, विज्ञान शाखेवर डॉ.व्यंकटेश शेरीकर यांची नियुक्ती. 

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर ता. प्रतिनिधी 

देगलूर, येथील अ.व्या. शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय कला वाणिज्य शाखेच्या उप प्राचार्य पदी प्रा.एम.एम. चमकुडे तर विज्ञान शाखेवर डॉ.व्हि.जी. शेरीकर यांची उप प्राचार्य पदी निवड करण्यात आली.दि. २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या संस्था संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील महिन्यात उप प्राचार्य पदावरून प्रा.उत्तमकुमार काबंळे सेवानिवृत्त झाले होते. या रिक्त पदावर कला शाखेतील हिंदी विषयाचे शिक्षक प्रा.एम.एम. चमकुडे आणि जीवशास्त्र विषयाचे शिक्षक प्रा. डॉ.शेरीकर व्हि.जी. यांची उप प्राचार्य पदावर नियुक्ती करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला.

या निवडीबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ. कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य देवेंद्र मोतेवार, नारायणराव मैलागिरे, सूर्यकांत नारलावार, गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर, गोविंदप्रसाद झंवर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ, उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार पर्यवेक्षक संग्राम पाटील, कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी आभिनंदन केले आहे.

 

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या