25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

◼️बुद्ध चंदू ओहोळ भारतीय सैन्या दलात भरती सैनिक काळाच्या पडद्या आड.

⚫ बुद्ध चंदू ओहोळ भारतीय सैन्या दलात भरती सैनिक काळाच्या पडद्याआड.

शिवगर्जना न्यूज,

नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव

 सांगली, आज दिनांक २९/०९/२०२४ रोजी काळाच्या पडद्याआड. काल कथीत बुद्धा चंदू ओहळ यांचा जन्म माळी नगर ता.अकलूज जि. सोलापूर येथे झाला. त्याचे सर्व शिक्षण कोल्हापूर या ठिकाणी झाले. ते S.Y. (BA) मध्ये असताना १९७७ साली सैन दलात भरती झाले. त्यांना आई, वडील आणि एकूण ५ भाऊ व २ बहिणी असा मोठा परिवार होता. कालकथित बुद्धा ओहळ यांचा विवाह १९८२ साली झाला. त्यांना १ मुलगा व २ मुली असून कालकथित बुद्धा ओहळ यांनी भारतीय सैन्य दलात एकूण २४ वर्षे देश सेवा केली. सेवा निवृत्त होण्याच्या पूर्वीच बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करीत असताना सेवा निवृत्त झाले. परत सरकारी नोकरीसाठी विविध ठिकाणी सेवेची संधी मिळून सुद्धा ती नाकारून त्या पुढील पूर्ण जीवन बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार सातत्याने करत त्यांनी गेली २५ वर्षा पासून सामाजिक व धार्मिक कार्य प्रामाणिक पणे केले. त्यांनी सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर पदवी व पदवीत्तर व शिक्षण केले. तसेच त्यांनी बौद्ध धम्माच्या तत्वानुसार प्रचार व प्रसार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. कवठे महाकाळ सारख्या दुष्काळ भागात अनेक धम्म परिषदा व धम्म शिबीर घेवून प्रबोधानत्मक धार्मिक व सामाजिक कार्य करून एक चांगल्या प्रकारे आदर्श निर्माण करून दिला आहे. बुध्द होवळ आणि श्रावस्ती विहाराचे नाते आगळे वेगळे आणि सलोख्याचे होतै. श्रावस्ती विहारमध्ये अनेक धम्म देसणा तसेच एक दिवशीय ध्यान शिबिर घेऊन सांगली जिल्ह्यात बुद्ध धम्म प्रचार प्रसार करून धम्म वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे एक सच्चे भीम सैनिक होते. त्यांचे आकस्मिक दिनांक २६/०९/ २०२४ रोजी दुःखद निधन झाले. बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली येथे विहाराचे माजी अध्यक्ष विलास उबाळे तथा ग्यानसेन यांच्या बरोबर नेहमी धम्म देसना आणि शिबिर घेण्यासाठी येत असत श्रावस्ती विहाराशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली यांच्या वतीने आज रविवार दिनांक२९/०९/२०२४ भावपूर्ण आदरांजली वाहून त्यांच्या बौद्ध धम्म प्रचार व प्रसारक कार्याबद्दल गौरव करण्यात आला. अशा सच्चा बौद्ध धम्माचा प्रचार अकस्मिक निघून गेल्यामुळे समाजामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी न भरून निघणारी आहे, विहाराचे संचालक व सदस्य आज रोजी त्यांच्या कवठेमहाकाळ या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

यावेळी विहाराचे सह खजिनदार जगन्नाथ आठवले, संचालक सी.बी. चौधरी, सदस्य बोधिसत्व भिमरत्न बोरखडे मामा, तसेच बाळू शिंदे मामा हे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या