
🔴 राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मुबंई येथे प्रचंड मोर्चा हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे — नरसी शहराध्यक्ष आवाहन.
शिवगर्जना न्यूज,
नायगाव ता. प्रतिनीधी : एस.ऐ.नरसीकर
०१ ऑक्टो.२०२४ रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघ द्वारा समाजाच्या न्याय, हक्क मागण्यांसाठी भव्य मोर्चाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले असून नांदेड जिल्ह्यातील चर्मकार समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नरसी शहराध्यक्ष यांनी केले. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप
यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मोर्चात आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे. सदर मोर्चा हा. ०१ आक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी होणार आहे. आपल्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त सहभागी होवून मोर्चा यशस्वी करावा. असे आवाहन अनील गंगासागरे राष्ट्रीय चर्मकार महासंघ नायगाव तालुक्यातील नरसी शहर अध्यक्ष पत्रकद्वारे केले आहे.















