25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️कवी प्रल्हाद पारटे यांना राज्यस्तरीय ग्रंथ मित्र पुरस्कार प्रदान.

🔴 कवी प्रल्हाद पारटे यांना राज्यस्तरीय ग्रंथ मित्र पुरस्कार प्रदान. 

शिवगर्जना न्यूज, 

प्रतिनिधी : जगदीप वनशिव 

पुणे – येथील “परिवर्तन” संस्था एक सामाजिक जाणीव ठेवणारी संस्था असून यांच्या वतीने दरवर्षी स्व. प्रा. सुनील संभाजी मते यांच्या स्मृती प्रित्यार्थ त्यांच्या जन्म दिनी राज्यस्तरीय ग्रंथ मित्र पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येत असतो. या वर्षीचा पुरस्कार जकातवाडी, सातारा येथील माझं कवितांचं गाव जकातवाडी राजधानी साताराचे अध्यक्ष मा. प्रल्हाद जयसिंग पारटे सरांना राज्यस्तरीय परिवर्तन ग्रंथ मित्र पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले पुरस्कारांचे स्वरूप मानपत्र श्रीफळ पुष्पगुच्छ शाल पाच हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला 

या कार्यक्रमात परिवर्तनचे विश्वस्त स्व. प्रा. सुनील संभाजी मते सर यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला गेला. हा पुरस्कार परिवर्तन परिवाराच्या वतीने गुलाब देडगे यांच्या शुभ हस्ते देण्यात आला.

सोहळ्याची सुरुवात अक्षय उर्डे यांनी प्रास्ताविक करून केली. त्यानंतर परिवर्तन परिवाराची ओळख करून देण्यात आली. प्रल्हाद पारटे सरांनी वाचन संस्कृती, विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालय, आणि जगातील पहिल्या “माझं कवितांचं गाव” जकातवाडी राजधानी सातारा, ग्रंथ महोत्सवातील वाचन चळवळ याविषयी उपस्थितांना माहिती दिली. वाचनामुळे जीवनात कसा सकारात्मक बदल घडतो, याबद्दल त्यांनी विचार व्यक्त केले आणि कविता जनमानसात पोहोचावी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. मराठी भाषे सोबत भारतातील इतर अठरा भाषां मधील कविता जकातवाडी येथे लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या उपक्रमाची व्याप्ती प्रत्येक जिल्हा आणि राज्यात वाढवण्याचा त्यांचा मानस आहे.

प्रफुल्ल कुलकर्णी म्हणाले हा पुरस्कार स्व. सुनील संभाजी मते सरांच्या चिरंतन आठवणींचा अनमोल ठेवा आहे आणि ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून वाचन प्रसार करणाऱ्या सेवाभावी कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची ही एक महान संधी आहे.

यावेळी प्रल्हाद पारटे सरांच्या पत्नी वैशाली पारटे यांचा देखील सत्कार करण्यात आला. परिवर्तन परिवार ही संस्था सध्या पुणे, मुंबई, सातारा या ठिकाणी अधिक कार्यरत आहे. इंद्राणी बालन ट्रस्टच्या साहाय्याने परिवर्तनने सातारा जिल्ह्यात गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी सायकल, संगणक, आणि दप्तर वाटपाचे उपक्रम राबवले आहेत.

पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित मान्यवरांमध्ये संजय मते, कुटुंबीय त्याचप्रमाणे शेखर वाल्लेकर, अशोक भाऊ जाधव पाटील, जीवन जाधव पाटील, प्रा. उमेश चौधरी, रोहित पुण्यस्वामी, सुधीर आवडे, कवी देवा झिंजाड, संतोष जगताप, अनिता घरमरकर, आशिष घुले पाटील, सचिन जगताप, किशोर ढगे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन प्रफुल्ल कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे येथे संपन्न झाला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या