25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️ हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी.

🔴 हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक नायगाव शहरात मोठ्या उत्साहाने साजरी.

शिवगर्जना न्यूज 

नायगाव ता प्रतिनीधी  : सय्यद निसार

नांदेड जिल्ह्यातील नायगांव बाजार येथे ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ च्या अनुषंगाने ‘जुलूस ए मोहम्मदी’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जुलूस मध्ये (मिरवणुकीत) लहान मुले, मुली, युवक व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होतेे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही इस्लाम धर्मांचे अंतिम प्रेरित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त दि.२२ सप्टेंबर २०२४ रोजी नायगांव बाजार येथे ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरा करून ‘जुलूस ए मोहम्मदी’ मध्ये ‘नारे तकबीर अल्हाह हू अकबर’ च्या जयघोष करत गावात हर्ष उल्लासात भव्य मिरवणूक काढण्यात आली. 

यावेळी नरसी, खैरगाव, पिंपलगाव, देगाव, घुंगराळा, लालवंडी कोलंबी, दत्तनगर, अझहरी नगर, मुल्ला गली, विठ्ठल नगर आजू बाजूच्या परिसरातील असंख्य मुस्लिम बांधव या मिरवणुकीत सामील झाले होते, यावेळी, काँग्रेस नेते तथा नगरपंचायत उपाध्यक्ष विजय पाटील चव्हाण, हणमंत चव्हाण, केशवराव चव्हाण, मणीक चव्हाण, पत्रकार शेख आरीफ रसूलसाब, पत्रकार सय्यद अजिम हाजी हुसेनसाब, यांनी नायगाव येथील जुलूस ला भेट देऊन मुस्लिम बांधवांना ‘ईद-ए-मिलादुन्नबी शुभेच्छा दिल्या तर जुलूस कमेटीच्या वतीने नायगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सय्यद रहीम शेठ, सेवा निवृत्त पो. उपुनिरीक्षक शेख हाजी लतीफ साब, काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद इसाक भाई, पत्रकार करीम चाऊस, जुनेद पठाण, सय्यद भाई मुल्ला, हाजी तौफिक बागवान, शेख इसाभाई, मुजाहिद सिद्दिकी, सय्यद फयाज सेठ, मुहीब शेठ कच्ची, आयुब फकीर साहब, सय्यद सिकंदर, नयूम भाईसेकर, माजिद हळदेकर, आसिफ सरदार, अंजार बिलोलीकर, अबू बकर मुस्तजर, आदम रहीमतुल, हाजी चांदसाब कोलंबीकर, शेख नजीर टेलर, बाबू जिलानी साब शेख गैस मुल्ला, चाँद कोलंबीकर, जाफर जलाल साब,शेख फयाज मुल्ला , शेख दाऊद इब्राहिमसाब, सय्यद एजास सेठ, शेख जमिल कोलंबीकर, वसीम पठाण, रियाज खुरेशी, दत्तनगर येथील युनूस समदानी, नगरसेवक शेख शकील नजीरसाब, पिपलगाव येथील, मौलाना गुलाम नबीसाब, मौलासाब खूरेशी, मोहीयोदीन साब, खैरगाव सय्यद चाँदसाब चाऊस, देगाव येथील ग्रामपंचायत सदस्य शेख इमाम जियाओदीन, शेख हाजी पाशा महम्मद, शेख सोनू खाजासाब, शेख सलावोदी बशीर साब, मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी नायगाव येथील शेळगाव रोड येथील विठ्ठल नगर सर्व मुस्लिम समाज बांधवांना हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त लाडू वाटप करून आनंद व्यक्त केला. यावेळेस प्रमुख उपस्थितीत सय्यद फयाज सेठ, खदीर बागवान, शेख नसीब, आसिफ सरदार पटेल, सय्यद आयुब सर, शेख मोसिन, शेख फयाज, आवेज पटेल, शेख सैलानी, शेख आरबाज, शेख आझम, आदील सिद्दीकी, शेख गफार कोलंबीकर, शेख आझहर, सय्यद लाल, तसेच नायगाव पोलीस स्टेशन पो. निरीक्षक कुभार यांच्या निगराणीत चौख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या