
🔴 रुग्ण सेवा मंडळाकडून शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कार सोहळा संपन्न.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी : (9923072242)
देगलूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी मागील पाच महिन्यांच्या कालावधीत विविध प्रकारच्या तब्बल ४३९ शस्त्रक्रिया यशस्वी रीत्या पार पडल्या आहेत. त्यामुळे उप जिल्हा रुग्णालय हे गरीब रुग्णांसाठी वरदान ठरले असून चांगल्या व पवित्र कार्य करणाऱ्या डॉक्टर व कर्मचारी वर्गाचा रुग्ण सेवा मंडळाकडून भव्य सत्कार करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांनी पदभार स्वीकारल्या पासून रुग्णालयात विविध आरोग्य सेवा व शस्त्रक्रिया चांगल्या प्रकारे केल्या जात आहेत. समर्पित भावनेने रुग्ण सेवा करणाऱ्या डॉक्टर व कर्मचारी वर्गाचा सत्कार करणे हे एक कर्तव्य आहे. या उदेशाने प्रस्तुत कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी रुग्ण सेवा मंडळाचे उपाध्यक्ष सुर्यकांत नारलावर होते. सत्कार कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव प्रा.डॉ. बालाजी कत्तूरवार यांनी केले. प्रास्ताविक विचारातून त्यांनी रुग्ण सेवा मंडळाच्या १९७७ मध्ये झालेल्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या विकासावर प्रकाश टाकला त्यात संस्थेचे मुख्यालय देगलूर येथे असून नांदेड महानगर पालिकेच्या बाजूला महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सार्वजनिक वाचनालय इ.स. १९८१ पासून कार्यरत आहे तसेच अर्धापूर तालुक्यातील दाभड फाटा येथे संस्थेच्या वतीने निसर्गोपचार आरोग्य केंद्र कार्यात असल्याचे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी आपल्या जन्म भूमीची बांधिलकी जपत मागील ४७ वर्षापासून दर महिन्याच्या पहिल्या रविवारी न चुकता देगलूर येथे येवून रुग्ण सेवा करतात ही बाब खूप प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केले तर सत्कारमूर्ती डॉ. नरेश देवणीकर यांनी या सत्कारामुळे आम्हाला अधिकाधिक काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे व हे सर्व रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी वर्गाच्या सांघिक भावनेतून काम केल्यामुळे शक्य झाले आहे. भविष्य काळात देगलूर येथे हजारोच्या संख्येत शस्त्र क्रीया होतील असा आत्मविश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ. नरेश देवनीकर. डॉ. अनिल थडके, डॉ.मुजीब शेख, डॉ. संजय लाडके, डॉ. संभाजी पाटील, डॉ. अमोल मोरे, डॉ. विदरात काझी, डॉ. उस्मान सर, मनीषा बोईनवाड, इन्चार्ज सिस्टर व कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी दमन काका चिद्रावार, उद्योगपती आयुब सेठ, शंतनू महाराज देगलूरकर व्यंकटराव कांबळे, रमेश नारलावार, सुभाष वडगावे, भाजपा संतोष पाटील, सौ. सपनाताई रेखावार, प्रा.डॉ.संतोष येरावार, प्रा.डॉ. भानुदास नरवाडे, प्रा.डॉ. नीरज उपलंचवार, राजू शिंदे व डॉक्टर, कर्मचारी सिस्टर, रुग्ण, रुग्णांची नातेवाईक, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.















