16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️अर्थसाहाय्या करीता कृषी विभागाशी संपर्क साधावा जिल्हा अधिकारी यांचे शेतकऱ्यांना आव्हान.

🔴 शेतकऱ्याने अर्थसाहाय्या करीता कृषी विभागाशी संपर्क साधावा —- जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत यांचे शेतकऱ्यांस आव्हान. 

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव

नांदेड जिल्ह्यातील व संपूर्ण तालुक्यातील : ई-पिक पाहणी तसेच सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेत प्रती शेतकरी २ हेक्टरच्या मर्यादेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार रुपये प्रति हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंद नसणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी अपूर्ण माहिती पूर्ण करावी ई- पिक पाहणी नोंदी नुसार शेतकरी खातेदार यांच्या याद्या कृषी विभागाने गाव निहाय ठळक ठिकाणी प्रदर्शित केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर कापूस / सोयाबीन पिकाची नोंद आहे मात्र ई-पिक पाहणी मध्ये त्यांचे नाव आले नाही अशा तक्रारी काही ठिकाणाहून प्राप्त झाल्या आहेत. कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत यासाठी खरीप हंगाम २०२३ च्या सात बारा उताऱ्यावर नोंद असून ई-पिक पाहणी पोर्टलवर नोंद नसलेले खातेदारानी आपले नाव, गाव, तालुका, जिल्हा, गट क्रमांक, एकूण सोयाबीन पिकाखालील क्षेत्र हेक्टर आर, एकूण कापूस ई. माहिती तक्त्यात नमुन्यात करुन सही निशी माहिती संबंधित गावचे कृषी सहाय्यक यांच्याकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले असून वनपट्टे धारकांनाही मिळणार मदत. 

राज्यात आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे वितरीत करण्यात आलेले आहेत. अशा वनपट्टे धारकांपैकी ज्या वनपट्टयावर खरीप २०२३ हंगामात कापूस किंवा सोयाबीन अथवा दोन्ही पिकांची लागवड केली होती या बाबतची माहिती गाव निहाय वनपट्टा क्रमांक, वनपट्टा धारक पूर्ण नाव, कापूस व सोयाबिन पिकाखाली असलेले क्षेत्र याची माहिती तक्त्यात संकलीत करुन कृषी विभागास सादर करावी, असे आवाहन प्रशासन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या