
🔴 अखिल भारतीय आदिवासी सेना संविधान वाचवा देश वाचवा निदर्शने करण्यात आले.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव
इगतपुरी : दिनांक१८/९/२०२४ रोजी अखिल भारतीय आदिवासी सेनेने तात्कालीन व विद्यमान सरकारकडे विविध मागण्या मागण्या सादर केल्या. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या आखत्यारीत त्या तात्काळ सोडवण्यात गेल्या असता परंतु तात्कालीन व विद्यमान सरकारने या मागण्या जाणीव पूर्वक सोडल्या नसून तमाम दलित व शोषित पीडित मागासवर्गीय अल्पसंख्यांक बहुजन समाजाच्या भावनेचा व महाराष्ट्रीय पुरुषांचा अवमान केला आहे. राज्य शासनाने काही प्रश्न त्यांच्या अधिकारातून एक दिवसात निर्णय घेऊन सोडवल्या आहेत परंतु आम जनतेच्या वतीने अखिल भारतीय आदिवासी सेनेचे सादर केलेल्या मागण्या व तक्रारी अर्जाची आज ही चौकशी व न्याय दिला नाही म्हणून आज या राज्याचे मुख्य व त्यांच्या महायुतीच्या राज्य व केंद्र सरकारकडे त्यांच्या कार्यकाळात सोडवल्या जाव्यात. या करीता लक्षवेधीसाठी माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या राहत्या ठाण्यातील टेंभी नाकावरील निवासस्थानावर लक्षवेध संघर्ष विऱ्हाड मोर्चाच्या आयोजन करावे लागत आहे. असे अखिल भारतीय आदिवासी सेना दि.ना.उघडे व त्यांच्या आदिवासी कार्यकर्ते मोठ्या संख्येने ठाणे व इगतपुरी या ठिकाणी एकत्र जमून माननीय जनरल मॅनेजर साहेब मध्य रेल्वे मुंबई डिव्हिजन यांनाही निवेदन देण्यात आले.
या मागणी निवेदनातून सादर केलेले सर्व प्रमुख मागण्यांचे आपले सरकार तात्काळ विचार करून असलेल्या कार्यकाळात सोडवा व आम जनतेला न्याय द्याल ही आग्रही मागणी करीत आहोत. १८ सप्टेंबर २०२४ बुधवार रोजी संविधान बचाव देश बचाव जन जागृती अभियान जन आंदोलनाच्या रेल्वे रोको आमच्या प्रमुख मागण्या,
(१) महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, जनरल मॅनेजर मध्ये रेल्वे यांच्याकडे सादर लक्षवेधी संविधान व घटना सुरक्षित ठेवण्यात यावे (२) महाराष्ट्रात मुंबई मध्य रेल्वेचे दादर रेल्वे स्थानक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल असे नामकरण करण्यात यावे (३) महाराष्ट्रात मुंबई चैत्यभूमी लगत इंदु मिल च्या जागेवर होऊ घातलेले जागतिक दर्जाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे बाबतची तातडीने सुधारणा करण्यात यावी. (४) महाराष्ट्रात नाशिक जिल्हा वासळी येथे होऊ घातलेले आदिवासी समाजाचे उदाहरण कार्यकर्ते संघर्ष कर्ते राघोजी भांगरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम जलद गतीने करण्यात यावे. (५) पालघर जिल्ह्यातील अकार्यक्षम व खोचकर ग्रुप ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या त्वरित बदली करावी (६) अतिक्रमित वनजमीन, गायरान, वाहूदारांच्या नावे कायम करावी (७) बेघर, भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला पाहिजे (८) इगतपुरी शहरासह जिल्ह्यातील व राज्यातील सर्व अतिक्रमणे झोपडपट्टी वसाहतीत वसाहती कायम करण्यात याव्या व अत्यावक्षक नागरी सुविधा मिळाव्या (९) शासकीय आश्रम शाळेत महिलांवरील इतरत्र महिलांवर शालेय विद्यार्थ्यांना व लैंगिक अत्याचार करणाऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी (१०) कोरोना काळात महाराष्ट्रासह अन्य भागातील प्रावासी भुसावळ पॅसेंजर सहय इतर पॅसेंजरचे तिकीट दर बंद करण्यात आली ती त्वरित सुरू करा (११) मध्य रेल्वे अनुकंप तत्त्वावर तसेच रेल्वेत सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती सेवेस घेण्यात यावे. (१२) केंद्र सरकारच्या अंतर्गत महाराष्ट्रात वनक्षेत्र वनपाल विभागात रोजगार हमी योजनेअंतर्गत वनमजूर या पदावर वर्षानुवर्ष ते आज पर्यंत काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या सेवेत कायम स्वरूपी करण्यात यावे. (१३) वनपाल व वन क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक रोहिया मजुरांची हजेरी मास्टर बुक नियमित करण्यात यावे. (१४) वन क्षेत्रात मजुरांना व वन विभागाकडून ड्रेस, बूट व स्वतःच्या संरक्षणार्थ साहित्य देण्यात यावे. (१५) वनपाल व वन क्षेत्रातील विभागातील हातभर होणाऱ्या रो.ह.यो.मजुरावरील अत्याचार त्वरित थांबवण्यात उ. नाशिक जिल्हा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी व इत्यादी. (१६) केंद्र सरकारच्या परिवहन रस्ते महामंडळाकडून नव्याने नागपूर मुंबई मार्गास जी. व्ही.प. आर कंपनीकडून नाशिक जिल्ह्यातील ठेकेदार श्री देवराम चिंधू मुदलीकर यांचे कामाचे व मजुरीचे थकबाकी बिल सर्वसाधारण १७ लाख रुपयाचे त्वरित देण्यात यावे. सदरची काम करून घेण्यासाठी कंपनी ही हैदराबाद येथील असली तरी या गोरगरीब आदिवासी मजुरांचे रक्कम त्वरित देण्यात यावे. (१७) राज्य व केंद्र सरकारच्या विचाराधीन असलेल्या सुशिक्षित बेकार बेरोजगार यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार त्वरित रोजगार देण्यात यावा.
इगतपुरी येथे अखिल भारतीय आदिवासी सेनेचे अध्यक्ष दि.ना. कार्यकर्ते मोठ्या संख्येने ईगतपुरी रेल्वे मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळेस सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग इगतपुरी घटनास्थळी दाखल झाले होते. सदरील निवेदन मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य पी. राधाकृष्णन, माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा. देवेंद्र फडणवीस, मा. जनरल मॅनेजर मध्य रेल्वे मुंबई डिव्हिजन भारत सरकार राज्याच्या व केंद्र सरकार यांच्या सेवेसाठी निवेदन सादर केले आहे. आ. भारतीय आदिवासी सेनेचे अध्यक्ष दि.ना. उघडे, ॲड. राजू पठाण, धनगर अध्यक्ष आनंदा गांगुर्डे, सुरेश माळी धुळे, सोमनाथ चौधरी, मंगला राऊत, पवार, अशोक पगारे व अनिता सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे.















