
🔴 डॉ.मिनलताई खतगावकर यांच्या वतीने इकळीमाळ येथे महाप्रसाद किर्तन कार्यक्रम संपन्न.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव
श्री संत परबतेश्वर महाराज संस्थान ईकळीमाळ ता.नायगाव येथे खतगावकर कुटुंबियांतर्फे प्रोष्ठपदी पौर्णिमा निमित्त कीर्तन व महाप्रसाद आयोजित करण्यात आले होते.
यावेळी डॉ.मीनलताई पाटील खतगावकर यांनी उपस्थित राहून संत परबतेश्वर महाराज समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
युवाचार्य संतोषजी महाराज आढावणे यांच्या सुमधूर वाणीतून कीर्तन श्रवण केले. समाजाला जागृत करण्यासाठी समाजकारणात आणि राजकारणात चांगली माणसे आली पाहिजे यासाठी खतगावकर कुटुंबीयांनी कीर्तन सोहळा आयोजित केला. खतगावकर कुटुंबियांच्या आशा आकांक्षा पूर्ण होवोत अशी भावना महाराजांनी व्यक्त करत आशीर्वाद दिला. सदरील कार्यक्रम राज्याचे माजी मंत्री तथा मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
याप्रसंगी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जितेंद्र दायमा, सभापती रवी पा. खतगावकर, संजय पा. इज्जतगावकर, प्रताप पा. जिगळेकर, एन.डी.पवार, उपसभापती आनंदराव बिराजदार, सभापती शिवाजी पाटील जाधव, पुंडलिक कौटकर, पत्रकार बाळासाहेब पांडे, ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख, नंदू पा. रातोळीकर, सुधाकर पा. मोकासदरा. सुरेश पा. खंडगावकर, बाळासाहेब मुदखेडे, दत्ताहरी पा. कावलगुडेकर, नारायणराव पोलीस पा, व्यंकट पा. जाधव, माधवराव पा. शिंगणापुरकर, गोविंद पा. हसेकर, पंडित पा. कुंचेलीकर, विलास पा. गोळेगावकर, शिवाजी माने, गोविंद पा. ढगे देविदास पा. हस्सेकर, शरद पा,गजानन पा.जाधव, राम लव्हाळे, प्रल्हाद शिंदे, देविदास शिळे, गोविंदराव सोनटक्के, विठ्ठल पा. पुयड, बालाजी पा.पुयड, प्रभाकर शिळे, तिरुपती पा. जाधव, मंदिराचे पुजारी माधवराव माली पा, शिवाजी माली पा. यांच्यासह परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.















