
🔴 सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सचिन भाऊ राउत यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा ईशारा.
शिवगर्जना न्यूज,
प्रतिनिधी
भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेच्या वतीने दि. ११/०९/२०२४ कामगार आयुक्त कार्यालय कामगार भवन बांद्रा कुर्ला संकुल, बांद्रा पूर्व मुंबई येथे आज सचिन भाऊ राऊत यांच्या नेतृत्वा खाली आंदोलन करण्यात आले, यावेळेस सुरक्षा रक्षकाचा गणवेशाचा रंग बदली बाबत तसेच इतर खालील प्रमुख मागण्या आपण १५ दिवसाच्या आत ठोस निर्णय घेऊन मागण्या पूर्ण करण्यात याव्या अन्यथा सुरक्षा रक्षक व त्यांच्या परीवारासहीत आपल्या कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल,
सुरक्षा रक्षकांच्या प्रमुख मागण्या
१) महाराष्ट्रातील १५ जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे एकत्रीकरण करून एकच महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ करण्यात यावे.
२) सुरक्षा रक्षकांच्या गणवेशांचा रंग खाकी किंवा प्यारमिलिटरीला मिळता जुळता करण्यात यावा.
३) सर्व मंडळामधील कार्यारत असलेल्या सुरक्षा रक्षकांचा भविष्य निर्वाह, पी.एफ. निधीच्या कार्यालयात जमा करण्यात यावे तसेच सेवानिवृत्त सुरक्षा रक्षकांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
४) जळगांव सुरक्षा रक्षक मंडळ अंतर्गत जळगांव, धुळे, नंदुरबार जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना नवीन वेतनवाढ तातडीने लागू यावी.
५) सर्व मंडळातील कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना मंडळा कडून दरमहा १५ तारखेच्या आत वेतन मिळावे. या विषयाचे निवेदन श्री वाघमारे यांना देण्यात आले.















