
🔴 मांजरम बौध्द विहार समोर पडलेल्या खडा बुजवण्याचे कामाला सुरुवात. मांजरमकर यांच्या मागण मुळे कामास सुरुवात तर राजकारण्यांचा पर्दापाश.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी निळकंठ जाधव
गडगा काहाळा रस्त्यावर मांजरम येथे बुद्ध विहार समोर पडलेला खड्डा त्वरित बुजवावा अन्यथा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी चक्का जाम करण्याचा इशाराया मांजंरमकरांच्या मागणीला यश आले असून रस्त्यात असलेला खड्डा बुजवण्याचे काम चार दिवस आगोदरच चालू झाले असल्याने माजरम ग्रमस्थात व प्रवाशी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वेळा राजकारण्यांनी दिले आश्वासनांचा पर्दा पाश झाला असून मांजरमकर यांनी दिलेल्या दणक्याने सर्वच जागे झाले आहेत.
रीपाई गवई गटाचे राष्ट्रीय सर चिटणीस मधुकर मांजरमकर हिगोली व मांजरम ग्रामस्थ यांनी गडगा काहाळा मार्गावर बौद्ध विहार मांजरम च्या समोर पडलेल्या खड्डा बुजवण्या करीता १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनी रास्ता रोकोची हाक मुख्यमंत्री व २५जणांना निवेदन देऊन दिली होती. याची धास्ती घेऊन सा.बा. उपविभाग मुदखेड व के. टी. कन्स्ट्रक्शन यांनी चार दिवस आगोदरच १४ सप्टेंबर रोजी खड्डा बुजवण्याचे कामाला सुरुवात केली असून खड्डे बुजवून पुलावरचा पाईप काढून दुसरा टाकून दुरुस्त करण्याचे आदेश सा.बा.आभियांता सचिन आईनापले यांनी के. टी. चे सुपर वायजर हेंडगे याना दिले सर्व समक्ष दिले.
या वेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे, सरपंच आशिष शिंदे, माजी सरपंच नीळकंठ मांजरमकर, माजी उपसरपंच प्र. हांनमत शिंदे, गिरीश पांडे, से. नि.शिक्षक पांडुरंग वाघमारे,या सह बौद्ध समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
▪️खड्डा बुजवून रस्त्याचे काम पूर्ण होई पर्यंत १७ तारखेचा चक्का जाम चा निर्णय स्थगित नसून या मधील पुढील दिशा १६ सप्टेंबर ला आंदोलन बाबद ठरवले जाईल अशी माहिती आंदोलन कर्ता प्रमुख मधुकर मांजरमकर यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना दिली.















