16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️नायगाव येथील बस स्थानक उभारण्यास सर्वच पक्षाचे आ. सर्वस्वी कुचकामी ठरले.

🔴 नायगाव येथील बस स्थानक उभारण्यास सर्वच पक्षाचे आ.कुचकामी ठरले. समाजवादीचे युवा जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील गवळी यांचा घणाघात. 

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव

नायगाव शहर हे विविध सुविधांची माहेरघर आहे तेव्हा जनावरांचा मोठा बाजार, शालेय संस्था, कापड दुकाने असे प्रगत असल्याने हजारो लोकांची दररोज वर्दळ नायगाव शहरात असते इथे बस स्टॅन्ड होणे अत्यंत महत्त्वाचे असूनही गेल्या अनेक दिवसा पासून इथे बस स्टँड उभे करण्यास विविध पक्षांचे आमदार कुचकामी ठरले आहेत असे समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील गवळी यांनी घनाघात केला आहे.

नायगाव शहर हे तालुक्याचे ठिकाण असले तरी इथे विविध सुविधेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाते ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी नायगाव शहरातील विविध शाळेमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना येणे जाणे करणे गरजेचे आहे तर विविध बाजारासाठी लोकांची देखील वर्दळ असते अशा हजारो लोकांची दररोज येजा होत असल्याने येथे बस स्टॅन्ड होणे अत्यंत गरजेचे असून यापूर्वी विविध पक्षांचे आमदार येथे कार्यरत होते पण त्यांच्या कार्यकाळात अजून तरी नायगाव येथे बस स्टँड झाली नाही त्यामुळे शालेय विद्यार्थी प्रवासी लहान थोर वृध्द या लोकांची बस स्टँड नसल्यामुळे तारांबळ होत आहे तेव्हा निवडणुका समोर आल्या की अनेक विषय पुढे येतात पण लोकांच्या ज्वलंत प्रश्नाचा विषय पुढे का येत नाही असाही सवाल येथील समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील गवळी आणि प्रहार दिव्यांग संघटनेची जिल्हा सहसचिव रामदास भाकरे यांनी केलेला आहे तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केल्या अनेक दिवसांपासून नायगाव येथील बस स्टॅन्ड ची मागणी असलेली ती पूर्णत्वाकडे न्यावी आणि लोकांच्या प्रवाशांच्या सोयी साठी नायगाव येथे शहर उभे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या