16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️दिगवंत खासदार पुत्र उमेदवारीस एकमताने ठराव पारीत.


🔴 दिगवंत खासदार पुत्रासाठी एकमताने ठराव पारीत. 

♦️काँग्रेस कमीटी बैठकीत ठरले लोकसभा पोट निवडणुक उमेदवार चव्हाण.

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव

खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने नांदेड लोकसभेची पोट निवडणूक लागणार आहे. त्यामुळे या जागेवर त्यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी, असा ठराव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत एकमताने पारित करण्यात आला. तर भाजपकडून आजघडीला तरी प्रतापराव पा. चिखलीकर यांचेच नाव पुढे येत आहे. ते सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत.

नांदेड खासदार वसंतराव चव्हाण यांचे २६ ऑगस्ट रोजी हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आगामी विधानसभा निवडणुकी बरोबरच लोकसभेची पोट निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मीनल खतगावकर विधानसभेला?

♦️माजी खासदार भास्करराव खतगावकर आणि काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्या मध्ये चर्चा होऊन जिल्ह्यातील पुढील राजकारणाची रणनीती ठरविण्यात आल्याची माहिती आहे. दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयाशी देखील चर्चा करून त्यांची इच्छा जाणून घेतली. तद्नंतर रवींद्र चव्हाण यांच्या नावाची शिफारस जिल्हा काँग्रेसने ज्येष्ठांकडे केली.खतगावकर अन् काँग्रेस पदाधिकारी यांच्यामध्ये झालेल्या

♦️चर्चेनुसार लोकसभेस चव्हाण तर विधानसभेला खतगावकर, असे सूत्र ठरविण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे माजी खा. भास्करराव पा. खतगावकर हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास त्यांच्या स्नुषा डॉ. मीनल खतगावकर ह्या काँग्रेसकडून नायगाव विधानसभेच्या उमेदवार असू शकतात. काँग्रेस कडून उमेदवार कोण? याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी नवीन मोंढा येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात जिल्हा कमिटीची बैठक झाली. या बैठकीत आगामी लोकसभा पोट निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दिवंगत नेते वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी द्यावे असा ठराव झाला. 

♦️प्रतापराव पा. चिखलीकर मुंबईत…. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवा नंतर ही भाजप पक्ष श्रेष्ठींच्या good book मध्ये प्रतापराव चिखलीकर यांचे नाव कायम आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा पोट निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी प्रतापराव चिखलीकर यांना मुंबईत बोलावले आहे.

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री गिरीष महाजन आणि प्रतापराव चिखलीकर यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत चिखलीकरांना काय आदेश दिला जातो तसेच भाजप कडून पुन्हा प्रतापराव पा. चिखलीकर हेच मैदानात उतरणार की अन्य नवीन नाव पुढे येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी ठराव मांडला, तर माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर यांनी ठरावास अनुमोदन दिले.

बैठकीच्या अध्यक्ष स्थानी बी. आर. कदम हे होते. ठरावाच्या बाजूने माजी महापौर अब्दुल सत्तार, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. रेखा चव्हाण, सुभाष रायबोळे, एकनाथ मोरे, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी – ठरावाच्या बाजूने सकारात्मक मत व्यक्त केले. आमदार मोहनराव हंबर्डे यांनी दूरध्वनीवरून रवींद्र चव्हाण यांच्या नावाला होकार दिला. बैठकीस- श्याम दरक, जे.पी. पाटील, प्रफुल्ल-सावंत, दिलीप बेटमोगरेकर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या