16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी एक अनोखा उपक्रम शाडू माती पासून गणपती तयार करणे.

🔴 वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी एक अनोखा उपक्रम शाडू माती पासून गणपती तयार करणे. 

शिवगर्जना न्यूज, 

नाशिक प्रतिनिधी : डॉ.शाम जाधव

नाशिक पंचवटी आज येथे एक अनोखा उपक्रम वृद्धाश्रमातील वृद्ध महिला यांनी गणेश मुर्त्या तयार करण्याचा ध्यास सुखप्रद फाउंडेशन आणि इलाईट क्लब यांच्या माध्यमातून वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी पंचवटी नाशिक या ठिकाणी शाडू मातीच्या श्री गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी अनेक आजी आजोबांनी सुबक श्री गणपती च्या मूर्ती तयार करत आनंद घेतला यावेळी या संपूर्ण टीमने सर्व आजी आजोबांकडून या मूर्ती बनवण्यासाठी चांगला प्रयत्न करून घेतला आणि सुबक अशा मूर्ती देखील त्यांनी तयार केल्या. विशेष म्हणजे आश्रमातील वय वृद्ध वर्ष १०१ असलेल्या कुलकर्णी आजी यांनी देखील आपल्या थरथरत्या हातांनी श्रीगणेशाची मूर्ती तयार केली व आनंद घेतला, यावेळी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सतीश सोनार सर, योगेश पिंपळगावकर आणि संपूर्ण स्टाफ यांनी देखील या उपक्रमा मध्ये सहभाग नोंदवत हा कार्यक्रम यशस्वी केला वृद्ध आश्रमातील महिला यांना कलेची आवड असताना अध्यक्ष सतीश सोनार सर व वृद्ध आश्रमातील कर्मचारी आपल्या पारिवारिक सदस्य यांची इच्छा पूर्ण करून गणेश मूर्ती बनवण्याचा उपक्रम साध्य केला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या