
🔴नारायण बापू नगर हाउसिंग सोसायटी निवडणूक सन २०२४ ते सन २०२९चा निकाल.
शिवगर्जना न्यूज
नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव
नाशिक, नाशिक रोड आज दिनांक ०५/०९/२०२४ रोजी नारायण बापू हाउसिंग सोसायटी त्यांच्या अधिपत्याखाली निवडणूक निर्णय घेण्यात आला अधिकारी आदरणीय सुवर्णा मोरे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली खालील निवडणुका पार पाडण्यात आल्या. चेअरमन म्हणून रितेश भाऊ गांगुर्डे यांची एकमताने निवड करण्यात आली. सचिव म्हणून आदरणीय बाळासाहेब सांगळे यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून पवन पगारे यांची निवड करण्यात आली.
मान्यवरांच्या झालेल्या निवडी खालील प्रमाणे सर्व संस्थेचे संचालक उपस्थित होते त्यांची नावे येणे प्रमाणे विनोद कदम, स्वामी सर, राजेंद्र मराठे, रमेश उगले, राजेभाऊ ठकोल्या, युवराज बर्वे, नितेश गांगुर्डे, बाळासाहेब सांगळे, दिलीप देशमुख, श्री देवरे, श्री मुठाळ, कनोजिया मॅडम, ठाकूर मॅडम, श्री रुपवते, पाटील साहेब, किरण बोरदे व पवन पगारे सर्व संचालक आज या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत एकमताने वरील पदांची निवड करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्या करिता मोलाचे सहकार्य आदरणीय संस्थेचे मॅनेजर संतोष नागरे व त्यांना साथ देणाऱ्या सोनल मुठाळ यांचे फार मोठे सहकार्य लाभले.
या ठिकाणी संस्थेचे कर्मचारी यांनी सुद्धा आज रोजी उपस्थिती नोंदवून आपले सहकार्याचे व साक्षीची नोंद केली. त्यामध्ये अरुण शेवरे, प्रकाश ठाकूर व देवा या ठिकाणी उपस्थित होते. सर्व सभासदांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.















