🔴 नायगाव तालुक्यातील ई-पीक पाहणी नोंद रद्द करून सरसकट सर्व कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करा. मा. उपविभागीय अधिकारी बिलोली क्रांती डोंबे यांच्या मार्फत मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांच्या कडे मागणी.
♦️राष्ट्रीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर यांनी केले.
शिवगर्जना न्यूज,
नायगांव तालुका प्रतिनिधी : परमेश्वर जाधव
खरीप हंगाम २०२३-२४ या काळात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे दोन हेक्टर पर्यंत हेक्टरी ५,००० रुपये आर्थिक मदत राज्य शासनाने जाहीर केलेली आहे पण ही मदत ई-पिक पाहणी ॲप द्वारे नोंदणी केलेल्याच शेतकऱ्यांनाच मदत मिळणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या लाभा पासून वंचित राहणार आहेत, असे आपल्याला निवेदनात मार्फत कळविण्यात येत आहे, त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी निवेदनाद्वारे बिलोली उपविभागीय अधिकारी क्रान्ति डोंबे त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांच्याकडे मागणी केलेली आहे.
यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पा. पवार होटाळकर, परमेश्वर पाटील जाधव कांडाळकर, सुगंधराव पाटील वडजे भीमराव वडजे, देविदास पाटील वडजे, शरद पाटील वडजे, कैलास, विलास, सूर्यकांत, प्रभाकर, संजय सर्व नायगाव तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.