
🔴 खतगावकर कुटुंबाचे कुलदैवत संगमेश्वर संगम येथे कीर्तन व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव
▪️असंख्य भाविकांनी घेतला कीर्तन व महाप्रसादाचा लाभ, नायगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी डॉ.मीनलताई खतगावकर यांनी कुलदैवतांकडे घातलं साकडं.
नायगाव विधानसभेच्या भावी आमदार डॉ.मीनलताई पाटील खतगावकर प्रथम श्रावण सोमवारचे अवचित्य साधून खतगावकर कुटुंबीयांचे कुलदैवत श्री संगमेश्वर देवस्थान संगम ता. धर्माबाद येथे किर्तन व महाप्रसादाचे आयोजन खतगावकर कुटुंबीयातर्फे करण्यात आले.
▪️सदरील कार्यक्रमास प्रवचनकार ह.भ.प.मधुकर महाराज सायाळकर यांनी आपल्या सुमधुर वाणीतून प्रवचन केले.आणि लोकप्रिय नेत्या डॉ.मीनलताई पाटील खतगावकर यांना भावी आमदार म्हणून आशीर्वाद ही दिला.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री संगमेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा मा.खासदार भास्करराव पा. खतगावकर यांची उपस्थिती होती. यावेळी माजी आ. अविनाश घाटे, बाळासाहेब पा. खतगावकर, भास्कर पा.भिलवंडे, आमदार जितेश अंतापुरकर यांच्या मातोश्री श्रीमती शितल अंतापुरकर जिल्हा परिषदचे माजी सभापती माधवराव मिसाळे, बिलोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी पा. खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
त्याच बरोबर प्रा.जीवन चव्हाण, सदाशिव पा, संतोष पा, कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पा. भाले, उप सभापती साईनाथ निवळे, गणेशराव पा. करखेलीकर, दत्ताहरी पा. चोळाखेकर, नागभूषण वर्णी, शिवाजी पा. जाधव, दत्ता हरी पाटील हिवराळे, प्रा.दुर्गाप्रसाद पांडे आदीची उपस्थिती होते.
याप्रसंगी नायगाव-उमरी-धर्माबाद तालुक्यातील बहुसंख्य भाविक भक्तासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.















