🔴 सुभाष लखपत्रेवार यांना पीएच. डी. प्रदान
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी ९९२३०७२२४२
अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन संशोधन केंद्रातील संशोधक विद्यार्थी सुभाष गणपतराव लखपत्रेवार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वतीने लोकप्रशासन विषययात पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
त्यांनी लोक प्रशासन विभाग व संशोधन केंद्र प्रमुख प्रा. डॉ. बालाजी राजेश्वर कतुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली “शिवकालीन प्रशासन – एक अभ्यास” या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता.
डॉ. बी.आर. कतुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ०८ विद्यार्थ्यानी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यात डॉ. नागेंद्र कांबळे, डॉ. महादेव जाधव , डॉ. गोविंद सूर्यवंशी, डॉ. साईदीप्ती कोपोलू , डॉ. दिग्विजय देशमुख, डॉ. बालाजी कोंकटवार, डॉ. निवृती तीरकमटे, व डॉ. सुभाष लखपत्रेवार यांचा समावेश आहे. तर सध्या ४ विद्यार्थी संशोधन कार्य करीत आहेत. लोकप्रशासन विषयातील संशोधक व मार्गदर्शक यांच्या यशा बद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सह सचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य डॉ. कर्मवीर उनग्रतवार, देवेंद्र मोतेवार, नारायणराव मैलागिरे, सूर्यकांत नारलावार, गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, शशिकांत चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर, गोविंद प्रसाद झंवर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ, उप प्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उप प्राचार्य प्रा. उत्तमकुमार कांबळे, पर्यवेक्षक श्री संग्राम पाटील, कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आभिनंदन केले.
















