16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️वीज समस्याग्रस्त ग्राहक तक्रारी व निवारण मेळावा संपन्न.—- वसंत पाटील सुगावे.

🔴 घुंगराळा येथे मा.अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त वीज समस्याग्रस्त ग्राहक तक्रारी व निवारण मेळावा संपन्न. —

वसंत पाटील सुगावे. 

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील घुंगराळा रा.काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जन विश्वास सप्ताह कार्यक्रमात घुंगराळा येथे वीज समस्याग्रस्त ग्राहकांच्या तक्रारी व निवारण मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी पं.स.सदस्य परबतराव पा.जाधव यांच्यासह महाविरण कंपनी चे उप अभियंता श्री. तिवारी साहेब, श्री दुधमल कनिष्ठ अभियंता जाधव, मा. जि.प. सदस्य, सरपंच सूर्याजी पा.चाडकर, भाजपा नेते शिवाजी पा. सावरखेडकर, श्री. स्वामी, श्री. पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात अनेक गावचे सरपंच, लोकप्रतिनिधी, शेतकरी, व्यावसायिक उपस्थित राहून आपापल्या गावातील विजेच्या समस्या महावितरण च्या अधिकाऱ्यांसमोर लेखी व तोंडी स्वरूपात मांडल्या. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी नसकारात्मकता दर्शवत सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावू असे उपस्थित लोक प्रतिनिधींना सांगितले. अनेक गावात डी.पी. नादुरुस्त असणे, पोल वाकणे नवीन पोल टाकणे, नवीन व वाढीव डी.पी. देणे, तारा लोंबकाळाने, वारंवार वीज पुरवठा खंडित होणे अशा अनेक समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या.

या कार्यक्रमास (सरपंच-रुई) नीलेश देशमुख, (सरपंच-मनूर ) नामदेव शिंदे, (सरपंच-इज्जतगाव) माधव डोईफोडे, (सरपंच वंजारवाडी) हणमंत कोंडेवाड, (सरपंच गंगणभीड) पिराजी दासरवाड, (सरपंच सांगवी) आनंदा पा. वडजे, (सरपंच सावरखेड) धोंडिबा इजगिरे, (सरपंच-निळेगव्हाण) आनंद बन, (सरपंच-हिप्परगा) संभाजी पवार, (सरपंच-कहाळा खु.) कोत्तापल्ले, (सरपंच-पाटोदा) जावेद खान, (सरपंच-रुई खु.) भगवान पा, (सरपंच-राणसुगाव) जाधव बाळू, (सरपंच-आंतरगाव) गजू पा. तोडे यांच्यासह अनेक सरपंच, शेतकरी, व्यावसायिक व ज्या त्या गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यावेळी बालाजीराव मातावाड, से.सं.सो. चेअरमन श्यामराव यमलवाड, माजी उपसरपंच शिवाजी पा. ढगे, अच्युतराव पा. ढगे, संभाजीराव तुरटवाड, शालेय समिती अध्यक्ष माधवराव पा.ढगे, ग्रामपंचायत सदस्य यशवंत पा. ढगे, मा.ग्रामपंचायत सदस्य गोविंदराव पांचाळ, बालाजी हाळदेवाड, गंगाधर पांचाळ, मुरहरी तुरटवाड, शंकरराव यलपलवाड, गंगाधरराव बोधनकर, गोविंदा पा. शिंदे, राजेश आलेगटलेवार, अशोक शेळके, सुभाष ढगे, ग्रामसेवक हणमंत पा. शिंदे, राजेश पा. ढगे, योगेश पा. ढगे यांच्यसह अनेक २० ते २५ गावचे नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या