🔴 ‘दैनिक जगमित्र’ संपादक यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी
♦️देगलूर राष्ट्रीय पत्रकार संघ (भारत) गंभीर बाबीकडे मा. उपजिल्हाधिकारी उपविभागीय कार्यालयात निवेदन सादर.
♦️वक्फ बोर्ड अध्यक्ष समीर काझी याने स्वतःचा गैरवापर करून माध्यमातून गुन्हा केला दाखल.
सविस्तर, देगलूर राष्ट्रीय पत्रकार संघ (भारत) या पत्राद्वारे आपणास अत्यंत गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन सादर केले आहे. ‘दैनिक जगमित्र’चे संपादक श्री. बालासाहेब कडबाने यांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून नेहमीच सत्य, पारदर्शक आणि लोकहितैषी पत्रकारिता करून प्रशासनासमोर वस्तुस्थिती मांडली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी याच्या विभागातील कथित भ्रष्टाचारी कारभाराविषयी सप्रमाण वृत्त प्रसिद्ध केले होते. हा कारभार लोकांसमोर आणि प्रशासनासमोर उघड झाल्याच्या रागातून, समीर काझी याने स्वतःच्या पदाचा गैरवापर करून, आपल्या सहाय्यकाच्या माध्यमातून बेगमपुरा (छत्रपती संभाजीनगर) पोलीस ठाण्यात संपादक बालासाहेब कडबाने यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने एक खोटा गुन्हा दाखल केला आहे.
केवळ सत्य बातमी छापली म्हणून पत्रकारावर अशा प्रकारे गुन्हा दाखल करणे, ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करणारी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी अत्यंत निषेधार्ह घटना आहे. राष्ट्रीय पत्रकार संघ (भारत) आणि तमाम पत्रकार बांधव अशा प्रकारची दडपशाही व खोटे गुन्हे कधीही खपवून घेणार नाहीत. आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो.
सदर संपादक बालासाहेब कडबाने यांच्यावरील तो खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा, पत्रकार हित आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, याची कृपया नोंद घ्यावी असे निवेदनाद्वारे कळविले.
यावेळी जिल्हाध्यक्ष ईरशाद पटेल, मारुती कूडकेवार, शहाजी वरखिंडे, अजीम अन्सारी, यादव ढाले, संतोष नामावड, वाघमारे आदींची उपस्थिती होती.
🔴मुख्य संपादक: श्री शहाजी वरखिंडे
मो. 9923072242