19.6 C
New York
Tuesday, November 3, 2026

Buy now

spot_img
spot_img

लोकहिताचे प्रश्न तळमळीने मार्गी लावणारा नेता — अभयसिंह देशमुख

लोकहिताचे प्रश्न तळमळीने मार्गी लावणारा नेता: अभयसिंह देशमुख

देगलूर प्रतिनिधी

देगलूर तालुका युवक काॅग्रेस अध्यक्षपदी अभयसिंह देशमुख यांची निवड झाली आहे.निवडीचे पत्र राज्याचे लोकप्रिय नेते मा.मुख्यमंञी मा.श्री आशोकरावजी चव्हाण साहेब यांनी अभयसिंह देशमुखांना काॅग्रेसच्या सर्व नेतेमंडळीच्या उपस्थितीत नांदेड येथे दिले.या निवडीचे नांदेड जिल्हा युवक काॅग्रेसमध्ये उत्साहाने स्वागत करण्यात आले. देगलूरमधील काॅग्रेस सर्व आजी माजी लोकप्रतिनिधि, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सदरील निवडीबद्दल आनंद व्यक्त होत आहे.

अभयसिंह देशमुख हे संघर्षशील नेतृत्व ते संघर्षातून राजकारणात पुढे आले. सर्वसामान्यांसाठी सदैव संपर्कात असणे, अभ्यासु नेतृत्व, रोखठोक बोलणारे नेतृत्व अभयसिंह यांची मोठ्या मनाचा चांगला माणूस म्हणून सबंध देगलूर तालूक्यातील राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रात त्यांची ओळख आहे. राजकीय कार्यकिर्दीच्या सुरुवातीपासूनच काॅग्रेस पक्षाशी एकनिष्ठ व काॅग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे विचार ग्रामीण भागात तळागळात पोहचविण्यासाठी सतत परीश्रम घेत आपल्या पक्षातील सर्वसामान्यांचे काम अत्यंत तळमळीने करत, आपल्या अभ्यासू वृतीने ते कामचा सतत पाठपुरावा करणारा, कष्टकरी, शेतकरी, शेतमजुर सर्वसामान्यांच्या प्रश्नांची चांगलीच जाण असणारा युवक काॅग्रेस नेता म्हणून अभयसिंह देशमुख परिचित.

युवक काॅग्रेस पदाधिकारी म्हणून काम करताना ग्रामीण भागात पक्षाचे संघटन मजबूत करणारे नेतृत्व अभयसिंह यांनी आपल्या गावी शाखाध्यक्ष म्हणून पक्ष कार्याची सुरुवात करत पुढे विधानसभा सरचिटणीस, विधानसभा महासचिव, करडखेड सर्कल काॅग्रेस अध्यक्ष या पदावर काम करताना आपल्या निरंतर निस्वार्थ कार्याच्या बळावर काॅग्रेसचा कर्तृत्वान युवक पदाधिकारी म्हणून ओळख निर्माण केले. तसेच लोकहिताचे प्रश्नाची जाण असणारा, अभ्यासु नेतृत्व, पक्ष संघटनेत सतत परीश्रम घेणारा युवक असून त्यांना युवक काॅग्रेस देगलूर तालुका अध्यक्ष म्हणून निवड योग्य असल्याची भावना काॅग्रेसच्या सर्वच आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, नेत्यांनी व्यक्त केले.

युवक काॅग्रेस माध्यमातून नेत्यास काम करण्याची जबाबदारी काॅग्रेस नेते मंडळीने सोपवली त्याबद्दल राज्याचे लोकप्रिय लोकनेते मा.मुख्यमंत्री आशोकराव चव्हाण, मा.राज्यमंत्री तथा मा.खासदार मा.श्री भास्कराव पाटील खतगावकर, देगलूर – बिलोली आमदार मा.श्री जितेश अंतापूरकर, युवक काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.श्री तिरुपती पाटील कोंढेकर, काॅग्रेस नेत्या मिनलताई खतगावकर, देगलूर तालुका काॅग्रेसचे अध्यक्ष मा.श्री शिवाजीराव देशमुख बळेगावकर, जि.प.मा. सभापती श्री माधवराव मिसाळे, काॅग्रेस उपाध्यक्ष मा.श्री प्रशांत पाटील हाणेगावकर, जिल्हा सरचिटणीस मा.श्री प्रशांत पाटील आचेगावकर, देगलूर बिलोली विधानसभा अध्यक्ष मा.श्री जनार्दन बिरादार यांच्यासह सर्वच काॅग्रेसच्या नेते मंडळीचा जाहीर आभार.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या