9.3 C
New York
Sunday, November 1, 2026

Buy now

spot_img
spot_img

*मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा*

“२४ तारखेपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर टोकाचे पाऊल”
“संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांंची विशाल सभा.”

संपादक:  शहाजी वरखिंडे

आज मीच काय प्रत्येक मराठा समाज जो आज अंतरवली आला होता त्याने न भूतो न भविष्यती अशी डोळ्यांची पारणे फेडणारी सभा बघीतली तसेच अनुभवली.. प्रत्येक मराठी माणूस हा या सभेसाठी स्वत:च्या स्वखर्चाने, मनापासून, भर उन्हात सकाळ पासून फक्त आणि फक्त मनोज जरांगे यांना ऐकण्यासाठी तसेच ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष देवून होता… 300 एकर खच्च भरून चारी बाजूने येणारांची संख्या डोळे दिपून टाकणारी होती. संपूर्ण भारतात काय तर जगात अशी सभा होणे नाही. आजच्या सभेतील जरांगे पाटलांचे महत्वाचे वाक्य..
“एक तर या सरकार कडून आरक्षण घेवून विजयी सभा घेणार नाही तर माझी अंतयात्रा तरी निघणार”

२२ ऑक्टोबर  पुढच्या आंदोलनाची दिशा पत्रकार परिषद घेऊन ठरणार आहेत. १० दिवसांत आरक्षण द्या अन्यथा पुढील सर्व जबाबदारी सरकारची असेल, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी गावातील सभेतून केला आहे. राज्य सरकारविरोधात आज मनोज जरांगे पाटील यांनी विराट सभा घेतली आहे. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळावे तसेच मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग तयार करून सुद्धा आरक्षण देऊ शकतो अशी मागणी केली. या सभेस आज नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून सकाळपासूनच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. काहीजण तर या ठिकाणी शुक्रवारपासून मुक्कामी होते. मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारवर अंतरवाली सराटी गावातील सभेतून धक्कादायक आरोप केला आहे. ‘हे सरकार मराठा बांधवांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. गुणरत्ने आणि भुजबळांना उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी असे ही यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या