आदर्श प्राथमिक शाळा नांदगाव येथे आज मराठा विद्या प्रसारक समाज संस्था चित्रकला स्पर्धा परीक्षा सन 2022-23 बक्षिस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न!
आज शाळेतील कु. सृष्टी स्वप्निल धनवटे वर्ग ४ थी (अ) हीने मराठा विद्या प्रसारक समाज संस्था चित्रकला स्पर्धा परीक्षा सन २०२२-२३ संपूर्ण संस्थेत पाचवा क्रमांक मिळवला म्हणून तिचा संस्थेकडून रोख रकमेचा चेक व प्रमाणपत्र शाळेचे मुख्याध्यापक मा.तांदळे सर यांच्या हस्ते व सर्व शिक्षक यांच्यासह देऊन गौरव करण्यात आला. तिच्या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्थेचे सरचिटणीस मा.नितिन भाऊ ठाकरे, नांदगाव तालुका संचालक मा.अमितभाऊ बोरसे व सर्व संचालक मंडळ, आदर्श प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.आर के गवांदे व सर्व सदस्य, गटशिक्षण अधिकारी मा.चिंचोले साहेब, मा.विस्तार अधिकारी साहेब, मा.केंद्र प्रमुख साहेब यांनी कु.सृष्टीचे कौतुक केले..! व कार्यक्रमास शुभेच्छा पाठविल्या…!
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री.प्रदिप शिरसाठ सर यांनी केले. तसेच या वर्षीही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मराठा विद्या प्रसारक समाज संस्था चित्रकला स्पर्धा २०२३-२४ सहभाग नोंदवावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येऊन संस्थेचा व शाळेचा नाव लौकिक वाढवावा असे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक मा. तांदळे सर यांनीही सृष्टी प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत यावे असे आवाहन केले.















