*मराठा आरक्षण अर्धवट घेणार नाही मनोज जरांगे पाटील*
मनोज जरांगे पाटील यांची सभा दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२३ रोजी नांदेड येथे पार पडली. सभेच्या सुरुवातीसच समाजाला मी माय बाप माणलो आहे त्यांच्यासोबत कदाचीतही गद्दारी करणार नाही, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत गावागावात जनजागृती सुरू ठेवली पाहिजे असे मत मांडले.
मराठा आरक्षणासाठी ८३ क्रमांकामध्ये मराठ्यांची जात ही कुणबी असा उल्लेख केलेला असून, आतापर्यंत कित्येक जाती पोट जाती म्हणून समाविष्ट केले गेले तर मराठ्यांची पोट जात कुणबी कशी काय होत नाही असा सवाल केला. विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे म्हणून त्यांना आरक्षण दिले गेले इकडे पण मराठा समाज शेतीच करतो त्यांना आरक्षण का बरं नाही असा सवाल केला. मराठा समाज चारही बाजूने घेरला गेला असून ही मराठा आरक्षणाची संधी घालवू नका. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजे .
नांदेड येथे झालेल्या मराठा आरक्षणासाठी संबंध जिल्ह्यातून आपली संघटना, आपला पक्ष, आपला नेता कोण, मी समाजासाठी काय केलं हे विसरून जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधव जरांगे पाटलांच्या सभेला आवर्जून उपस्थित होता.















