25.3 C
New York
Thursday, August 27, 2026

Buy now

spot_img
spot_img

⚫ शारदा बाई जोशी कोलंबीकर यांचे निधन.

⚫ शारदा बाई जोशी कोलंबीकर यांचे निधन. 

शिवगर्जना न्यूज, 

नायगाव प्रतिनिधी

कोलंबी चे सरपंच तथा कोलंबी मांजरम या भागातील वेद शास्त्र संपन्न व्यक्तिमत्व स्व. बापूदेव जोशी कोलंबीकर यांच्या पत्नी, शारदा बाई बापुदेव जोशी यांचे रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी ११.४० वाजता खाजगी रुग्णालय नांदेड येथे उपचारामुळे निधन झाले. मृत्यू समयी ८५ वर्ष  होते. पश्चात तीन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पार्थिवावर नायगाव येथील सार्वजनिक स्मशान भूमी येथे १४ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

या वेळी वारकरी संप्रदायातील दिग्गज कीर्तनकार किशन महाराज बरबडे कर, बाबू महाराज काकांडीकर, मधुसूदन महाराज कापसिकर, चंद्रकांत महाराज लाठकर, नितळीकर, धसवाडीकर महाराज, विष्णू महाराज तांदळीकर यांनी कीर्तन सेवा सादर करून श्रद्धांजली अर्पित केली. गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर, अमरीश महाराज देगलूरकर, राजेश महाराज देगलूरकर यांनी यावेळी भेट देऊन जोशी परिवाराचे सांत्वन केले.

अत्यंसंस्कार समयी श्रीधर महाराज कासारालीकर, बालाजी गुडेवार, कोनगुले महाराज, त्र्यंबक महाराज स्वामी, हणमंतराव पाटील चव्हाण, शिवराज पाटील होटाळकर, धनराज शिरोळे, शिवाजी पनासे या सह राजकीय, सामाजिक, धार्मिक, वारकरी, पत्रकार, क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी आदरांजली व्यक्त केली.  जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे भावना व्यक्त करून सार्वजनिक श्रद्धांजली घेतली. त्या हरिदेव, मुकुंद देव, व वासुदेव बापुदेव जोशी कोलंबीकर यांच्या मातोश्री होत.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या