मौजे चैनपुर ग्रामपंचायत कार्यालय येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
मौजे चैनपुर ग्रामपंचायत येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी स्वातंत्र्यसैनिक रामराव नरसिंगराव सुरावर शहापूरकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय चैनपुर येथे ध्वजारोहण करण्यात आले. प्रतिवर्षाप्रमाणे यावेळी ध्वजारोहण करत असतांना ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य व सरपंच उपसरपंच यांनी स्वातंत्र सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला.शहापूर येथील समाजकारणाची आवड असणारे, मनमिळावू स्वतंत्र सैनिक रामराव सुरावर विनंती सह त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण करून शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. चैनपुर ग्रामपंचायत कार्यालयच्या कारकिर्दीत एक स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मान यावर्षी ग्रामपंचायतीने एका स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून खऱ्या अर्थाने आपणाला मराठवाडा मुक्त करण्यामध्ये ज्या हाताने परिश्रम घेतले त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्याचं कार्य चैनपुर ग्रामपंचायतने केले. या कार्याबद्दल गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक, विद्यार्थी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायतचे सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष समिती सदस्य व गावातील सर्व ग्रामस्थ नवतरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वतंत्र सैनिकांचे अनुभव त्यांच्या शब्दात ऐकले शेवटी आभार
ग्रामपंचायतचे उपसरपंच मारोतीराव हनेगावे यांनी मानले. ग्रामपंचायतीच्या आकर्षित कार्यक्रमाबद्दल मौजे चैनपुर नागरिकांमध्ये स्वातंत्र्य सैनिका बद्दल मराठवाडामुक्ती संग्राम दिना बद्दल तसेच व देशाबद्दल एक प्रकारे नवचैतन्य एक अभिमान पसरविण्याचे कार्य चैनपुर ग्रामपंचायतीने केले आहे.