मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त श्री. नागनाथ आऊलवार याचा देगलूर प्रशासनातर्फे सत्कार.
प्रतिनिधी, हानमंत कदम
मो.नं. 8698803982
देगलूर : श्री साई इडली सेंटर व गुरुकृपा हॉटेल चे चालक श्री नागनाथ आऊलवार हे मागील 20 वर्षापासून शहरातील विविध रुग्णालयातील रुग्णांना गरम पाणी, पिण्याचे शुद्ध पाणी व जेवणासाठी जागा उपलब्ध करून देणे अशी मोफत सेवा देत आहेत.
याच कार्याची दाखल घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालय तर्फे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सत्कार केला.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी माननीय कुलदीप जंगम, माननीय तहसीलदार राजाभाऊ कदम, माननीय बि.डि.ओ. माननीय शेखर देशमुख, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते. देगलूर येथील श्री साई इडली सेंटर व गुरुकृपा हॉटेल चे चालक श्री नागनाथ आऊलवार हे गेल्या २० वर्षापासून शहरातील विविध रुग्णालयातील रुग्णांना गरम पाणी, पिण्याचे शुद्ध पाणी व जेवणासाठी जागा उपलब्ध करून देणे अशी मोफत सेवा देत आहेत. या समाज कार्याची दाखल घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय, देगलूर प्रशासनातर्फे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सत्कार केला. यावेळी सहाय्यक मा.जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, मा.तहसीलदार राजाभाऊ कदम, मा.बि.डी.ओ. शेखर देशमुख, मा.पोलीस अधिकारी इतर मान्यवर व नागरिकांची उपस्थिती होती.