9.9 C
New York
Friday, May 1, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️राजमाता जिजाऊ वस्तीगृहात जिजाऊ जन्मोत्सव साजरा

🔴राजमाता जिजाऊ वस्तीगृहात जिजाऊ जन्मोत्सव साजरा. 

शिवगर्जना न्यूज, 

मुखेड: प्रतिनिधी 

मुखेड(१२ जाने.) शहरातील नामांकित राजमाता जिजाऊ वस्तीगृहामध्ये १२ जानेवारी रोजी स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी युवकांचे प्रेरणास्थान असलेले तेजस्वी व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद यांची जयंती ही उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त वस्तीगृहातील उपस्थित विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या महामानवच्या जीवन चरित्रावर भाषणे केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दंतरोग तज्ञ डॉ. पांडुरंग श्रीरामे तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प.प्रा शाळा जांभळी मुख्याध्यापक सूर्यवंशी, केमिस्ट तालुकाध्यक्ष बाळानंद गबाळे, डॉ. सिद्धांत इंगोले, सहशिक्षक संतोष तळेगावे, ए.सी. जाधव प्रथम मान्यवराच्या हस्ते जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली. तद्नंतर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी भाषणे केली. यामध्ये उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यास मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. प्रथम बक्षीस मिळवणारा विद्यार्थी पांडुरंग रामदास वडेर, व द्वितीय पारितोषिक मिळवणारा विद्यार्थी, निरंजन वडजे तसेच तृतीय म्हणून ऋतुराज पाटील हे होत. 

भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना छोटेसे बक्षीस संचालक गंगाधर बिरादार सर यांच्या वतीने देण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे भाषणे संपल्यानंतर उपस्थित डॉ. सिद्धांत इंगोले त्यांना मार्गदर्शन केले, तसेच तळेगावे यांनी जिजाऊ माँसाहेब यांच्या जीवन चरित्रावरील काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या तसेच त्यांच्या आवडीची “स्वप्नातली परी” ही कविता म्हणून दाखवली या कविता म्हणताच सर्व मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. विठ्ठलराव सूर्यवंशी जीवनातील “आईचे महत्व” यावर सविस्तर मार्गदर्शन केले. समारोपर भाषणामध्ये डॉ. पांडुरंग श्रीरामे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सोयी सुविधे पेक्षा आपल्या ध्येयाकडे अधिक लक्ष द्यावे आणि आपण ग्रामीण भागातून आहोत म्हणून न्यूनगंड न बाळगता परिश्रम घेऊन आलेल्या अडचणीला यशाची संधी समजून पाहिलं पाहिजे, आणि वेळेला महत्व दिलं तर ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा, डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर व सर्व स्तरातील मोठे अधिकारी होऊ शकतात. पण त्यासाठी जिद्द, चिकाटी, अधिकचे परिश्रम घेणे अतिशय गरजेचे आहे. विद्यार्थी तुम्ही कितीही मोठे व्हा, अधिकारी व व्यवसायिक क्षेत्रातील उद्योजक व्हा पण तुमच्याकडे वक्तृत् बोलण्याची शैली नसेल तर तुम्ही त्या क्षेत्रात नावलौकिक मिळू शकत नाही. त्यामुळे आपल्यामध्ये बोलण्याची कला अवगत असणे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे बिरादार यांनी जी संधी आपणास उपलब्ध करून दिलेली आहे त्या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. 

कार्यक्रमाचे आभार राजमाता जिजाऊ वस्तीगृहाचे संचालक गंगाधर बिरादार सर यांनी मानले व उपस्थित मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाला उपस्थिती व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन, गणेश टापरे माधव बोमनगे, सर्वच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या